प्रतिनिधी सुधीर गोखले
महापालिका क्षेत्रामधील रस्ते चकाचक करण्याचा कालपासून प्रशासनाने संकल्प सोडला असतानाच आज आयुक्त शुभम गुप्ता यांनी सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते, संस्था यांनी परिसर सुशोभिकरण मोहीममध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही केले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत काही दिवसांपूर्वी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ तसेच उपायुक्त विजया यादव आदी अधिकारी थेट रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहायला मिळाले तर काल महास्वच्छता अभियान राबवत आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र ताटे यांच्या नेतृत्वाखाली १२०० स्वच्छता कर्मचारी यांनी १५ टॅन कचऱ्याचे संकलनही केलेय अशा पद्धतीने आता स्वच्छता हा महापालिका क्षेत्रातील केंद्रबिंदू असेल. आता प्रत्येक प्रभागामध्ये अचानकपणे आयुक्त शुभम गुप्ता भेट देऊन घंटा गाड्या किंवा स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांची हजेरी घेत आहेत तर इतर सहकारी अधिकाऱ्यांना प्रत्येक प्रभागात भेटी देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. स्वच्छता मोहिमेबाबत काही नागरिक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अगदी बोलक्या प्रतिक्रिया दिल्या आहेत शिवसेना उप शहर प्रमुख (शिंदे गट) सादिक पठाण आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हणतात मैशाळ रोड वांढरे ट्रेडर्स समोरील परिसर कचऱ्याचे ढीग साठून दुर्गंधी पसरली होती त्याचा नागरिकांना त्रास होत होता. नागरिकांनी अखेर आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे तक्रार केली सत्वर दखल घेत स्वच्छता निरीक्षक सचिन वाघमोडे यांनी सह आयुक्त अनिस मुल्ला यांच्या नियोजनाखाली टीम घेऊन तेथिल परिसराचे रुपडे पालटले नागरिकांनी कचरा टाकू नये या साठी परिसराची स्वच्छता केलीच पण त्या ठिकाणी सुशोभिकरण करून परिसराचे रुपडेच बदलले, बदलेल्या परिसराचे रूप पाहून लोकांनी देखील दखल घेतली आहे.
मिरज हि आरोग्य पंढरी
मिरजेला आरोग्य पंढरीचा दर्जा मिळालाय मात्र काही लोकांच्या चुकीच्या वागण्याने कचऱ्याचे शहर म्हणून नाव पडत होते. पण काल तीन जानेवारीला एक चांगला प्रत्यय पाहायला मिळाला कचऱ्याच्या ठिकाणी सुशोभिकरण करून कचरा गायब तर केलाच पण इथल्या नागरिकांना एक सुखद धक्का मिळाला. ज्यावेळी सर्व मिरजकर गुलाबी थंडीमुळे झोपेत होते. त्यावेळी मनपा आरोग्य विभागाच्या टीमने एक कचऱ्याचा पॉईंट गायब केला आणि त्या जागी सुशोभिकरण करून नवीन चैतन्य त्या ठिकाणी आणले. कचरा दिसल्यास मनपा आरोग्य विभागाला नावे ठेवण्यात नागरिक आनंद मानत असतात, पण चांगल्या कामाला दाद देणारे अपवाद असतात. पण आम्ही सतत काम करण्याऱ्याच्या मागे ठामपणे ढाल म्हणून उभे राहू असा विश्वास स्वच्छता निरीक्षकांसह स्वच्छता कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे
साथ तुमची प्रयत्न आमचे
कचरा असो वा अन्य समस्या, आम्ही कोणतीही समस्या सोडवण्यासाठी सुसज्ज आहोत. स्वच्छ शहर सुंदर शहर प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मदतीचा एक हात आपलाही हवा
एक सफाई सैनिक
सांगली मिरज कुपवाड महापालिका.
“कुठलंही शहर ही कायम जिवंत व्यवस्था असते, ती सातत्याने बदलत असते. व्यवस्थेत कायमच नवनवे प्रश्न निर्माण होत असतात. आपण सगळेच ते प्रश्न आपापल्या परीने सोडवित असतो. आमचाही तोच प्रामाणिक प्रयत्न असतो. अशा प्रतिक्रिया आम्हाला काम करायला प्रोत्साहित करतात, त्यातून आम्हाला ऊर्जा मिळते. अशा नागरिकांबद्दल आम्ही सर्व महापालिका प्रशासन कृतज्ञ आहे”.
:शुभम गुप्ता
आयुक्त तथा प्रशासक
सांगली मिरज कुपवाड महापालिका
Discussion about this post