शंकरराव ढगे 9890964982
अर्धापूर/प्रतिनिधी
तालुक्यातील लहान- लोण येथील तपोवन बुध्द भुमीच्या निसर्गरम्य माळटेकडीवर दिनांक ८ व ९ फेब्रुवारी रोजी २२ वी अखिल भारतीय बौध्द धम्म परिषद साजरी होणार – असून या धम्म परिषदेच्या पुर्व तयारीसाठी दिनांक ५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक राजेश लोणे यांनी केले आहे.
अर्धापूर – तामसा रोडवरील लहान- लोण परिसरात कालवश दलितमित्र निवृत्तीराव लोणे व कालवश संजयराव लोणे यांच्या आथक परिश्रमातून निर्माण झालेल्या निसर्गाच्या सानिध्यात ऊंच अशी तपोवन बुध्द भुमी, स्वा.सै. आबासाहेब लहानकर नगर टेकडी येथे आहे. या टेकडीवर तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य असे पूर्णाकृती पुतळे असून तपोवन महाविहाराचे बांधकाम करण्यात आले आहे. सध्या येथे मोठ्या प्रमाणात सामाजिक, धार्मिक कार्यक्रम घेतले जातात तसेच दरवर्षी अखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेचे आयोजन केले जाते. या धम्म परिषदेसाठी देश – विदेशातील विद्वान भिक्खू संघाकडून धम्मदेशना दिली जाते. २२ व्या बौध्दधम्म परिषदेच्या पुर्व तयारीसाठी दिनांक ५ जानेवारी रविवार रोजी सकाळी १० वाजता महत्त्वपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुज्य भदन्त पय्याबोधी थेरो, पुज्य भदन्त सुभूती थेरो, पुज्य भदन्त शिलरत्न व भिक्खु संघाच्या उपस्थितीत पूजापाठ व धम्मदेशना होणार असून या बैठकीसाठी तीर्थक्षेत्र बावरीनगरचे महाऊपासक डॉ. एस. पी. गायकवाड व भिक्खु संघ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच परिसरातील प्रतिष्ठित मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, उपासक, उपासिकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन आयोजिका तथा लोणी खु. सरपंच श्रीमती आनूसयाबाई लोणे, स्वागताध्यक्ष तथा सभापती संजय देशमुख लहानकर व संयोजक राजेश लोणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Discussion about this post