शंकरराव ढगे 9890964982
अर्धापूर, प्रतिनिधी
जिल्हा परीषद प्राथमिक शाळा देळुब बु. येथे भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्या उगले, भक्ती मोरे, अश्विनी जाधव, तेजल हाटकर, रामचंद्र गरड, श्रेयश भालके, कुणाल गायकवाड, आरती लिंगायत, प्राजक्ता निखाते, साधना गवळी, ज्योती बनसोडे, भक्ती कऱ्हाळे या विद्यार्थीनीनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची सुंदर अशी वेशभुषा परीधान करून विद्यार्थिनींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबाबतची माहीती गीत गाऊन, भाषणामधून, नाटक सादरीकरण करून विद्यार्थ्याना दिली. यावेळी मुख्याध्यापक शिंदे सर, मस्के सर, देसाई सर,कोळी मॅडम, सूर्यवंशी मॅडम, फुलारी मॅडम, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

Discussion about this post