
लोणार ता प्र :-सुनिल वर्मा
दि. 5./1/25
सप्तशृंगी महिला अर्बन बँकेच्या वतीने सातत्याने भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजला जाणाऱ्या पत्रकारांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. सप्तशृंगी महिला अर्बन बँकेच्या वतीने पत्रकारांच्या सत्कार कार्यक्रमात बोलतांना अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी सप्तशृंगी महिला अर्बन बँकेच्या अध्यक्षा माधुरीताई देवानंद पवार या भविष्यात निश्चितच मोठ्या बनतील अशी भविष्यवाणी करीत त्यांनी सप्तशृंगी सप्तशृंगी महिला अर्बन बँकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती सांगत सप्तशृंगी महिला अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष देवानंद पवार तसेच माधुरीताई देवानंद पवार यांचे सामाजिक कार्य वाखाणण्याजोगे असल्याचे सांगत त्यांचे भरभरून कौतुक केले या सत्कार सोहळ्यात खासदार निलेश लंके यांच्या हस्ते पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय अंभोरे ,प्रमुख मार्गदर्शक म्हणून अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके ,आमदार सिद्धार्थ खरात, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण घुमरे, माजी सभापती नंदकिशोर बोरे, राष्ट्रवादीचे भास्करराव काळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर, काँग्रेस नेते दिगंबर मवाळ , ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रमोदबापू देशमुख, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वसंतराव देशमुख, उबाठाचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आशिष राहाटे, शहर प्रमुख किशोर गारोळे, तालुकाप्रमुख तथा माजी सभापती निंबाजी पांडव, माजी सभापती सागर पाटील वानखेडे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, गजानन तात्या कृपाळ, पत्रकार सिद्धेश्वर पवार ,दत्ता उमाळे, सप्तशृंगी महिला अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेस तालुकाध्यक्ष देवानंद पवार, सप्तशृंगी महिला अर्बन बँकेच्या अध्यक्षा माधुरीताई देवानंद पवार, उबाठाच्या महिला जिल्हाप्रमुख जिजा राठोड, काँग्रेस सेवादलाच्या जिल्हाध्यक्ष आरती दीक्षित, विनायक टाले नाझीम कुरेशी, विधिज्ञ आकाश घोडे ,संदीप गवई आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात, विजय अंभोरे लक्ष्मण घुमरे ,श्याम उमाळकर, पत्रकार सिद्धेश्वर पवार यांची भाषणे झाली लोकशाहीच्या तीन आधारस्तंभांना नियंत्रित करण्याचे काम पत्रकार करतात:आमदार सिद्धार्थ खरात भारतीय लोकशाहीचे इतर जे तीन आधारस्तंभ आहेत त्या आधारस्तंभांना नियंत्रित करण्याचे काम तसेच समाजामध्ये जागृती करण्याचे काम आपल्या लेखणी द्वारे पत्रकार बांधव सातत्याने करीत असतात असे प्रतिपादन यावेळी बोलतांना आमदार सिद्धार्थ खरात यांनी करीत माझा विधानसभा निवडणुकीतील विजय सुकर करण्यात पत्रकार बांधवांचा फार मोठा वाटा असल्याचे सांगत पत्रकार बांधवांच्या जीवनात सुद्धा वैयक्तिक अडी अडचणी असतात परंतु मेहकर तालुक्यातील पत्रकार बांधवांची मुख्य अडचण म्हणजे पत्रकार भवनाची निर्मिती असल्याचे सांगत बुलडाणा येथे पत्रकार भवन झाले असून मेहकर येथील पत्रकार भवनासाठी पुढाकार घेण्याचे अभिवचन यावेळी बोलतांना आमदार सिद्धार्थ खरात यांनी उपस्थित पत्रकार बांधवांना दिले.पत्रकार बांधवाचा २ लाख रुपयांचा विमा काढण्यात आला सप्तशृंगी महिला अर्बन बँकेच्या वतीने पत्रकार बांधवाचा २ लाख रुपयांचा अपघात विमा काढण्यात आला . यावेळी खासदार निलेश लंके यांच्या हस्ते पत्रकार सचिन गोलेछा सह पत्रकार बांधवांना विमा पॉलिसी प्रदान करण्यात आली.विमा काढण्यासाठी लोणार येथील पत्रकार शेख सजाद शेख करामत यांनी सहकार्य केले. यावेळी या कार्यक्रमास मेहकर लोणार तालुक्यातील समस्त पत्रकार बांधवांसह विष्णुपंत पाखरे ,संतोष नरवाडे ,प्रदीप देशमुख, डॉ. भरत आल्हाट, संतोष लाड, गजानन चनेवार, अंकुश राठोड,संदीप ढोरे ,सतीश खुरद,वामनराव मोरे यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सप्तशृंगी महिला अर्बन बँकेचे अध्यक्ष माधुरी देवानंद पवार यांनी तर आभारप्रदर्शन सप्तशृंगी महिला अर्बन बँकेचे संस्थापक उपाध्यक्ष विष्णू वाकळे यांनी केले.
Discussion about this post