वणी – येथील श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी , राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय व छत्रपती शाहू महाराज आय टी आय यांच्या संयुक्त विद्यमानाने वार्षिक स्नेहसंमेलन संस्कार २०२५ चे उद्घाटन डॉ. श्री. भालचंद्र चोपणे माजी कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या अध्यक्षतेत श्री. किशोरजी गज्जलवार गटविकास अधिकारी पंचायत समिती वणी यांच्या हस्ते दिनांक २ जानेवारी २०२५ रोजी पार पडले. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव मा. ओमप्रकाश चचडा, संचालक मंडळाचे सदस्य तसेच इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी कॉलेज मारेगाव चे प्राचार्य मा. डॉ निलेशजी चचडा, संचालक मंडळाचे सदस्य मा. विक्रांतजी चचडा, राजश्री शाहू महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक अभय पारखी, छत्रपती शाहू महाराज आय टी आय चे प्राचार्य आकाश कांबळे व वणी पब्लिक स्कूलचे प्राचार्य प्रफुल महारतळे यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व शाळांचा वार्षिक अहवाल सादर करीत असतानाच संस्कार हे केवळ नाट्य, नृत्य यांचा अविष्कार न राहता हे विचारांचे अंतर्मुख करणारे संमेलन असल्याचे प्रतिपादन डॉ. निलेश चचडा यांनी केले.कार्यक्रमाच्या उद्घाटकीय भाषणाद्वारे मा. किशोरजी गज्जलवार यांनी विद्यार्थ्यांचा शालेय जीवनात वार्षिक स्नेसंमेलनाचे अनन्यसाधरण महत्त्व विषद केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्रजी चोपणे यांनी श्री. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचा आजपर्यंतच्या प्रवासाचा उल्लेख करीत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखीत गुणवत्ता पूर्ण शिक्षण प्रदान करण्याकरिता सतत प्रयत्नरत असल्याने या संस्थेला उज्वल भविष्य असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.संस्कार २०२५ अंतर्गत वक्तृत्व ,गीत गायन, नृत्य,रांगोळी, फुलसजावट,फॅशन शो,पोस्टर मेकिंग ,वेशभूषा विविध रंगारंग कार्यक्रम व विविधक्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेद्वारा दिला जाणारे पुरस्कार स्वर्गीय हंसराज जी चचडा आर्यभट पुरस्कार कु. आर्या मत्ते, कु. हर्षदा आवारी व स्वरा मुळेवार यांना तसेच स्वर्गीय कल्पना चावला पुरस्कार कु. रूषाली खारकर व हर्षदा आवारी यांना व स्वर्गीय श्री नंदकिशोर जी चचडा स्मुर्ती पुरस्कार चेतन बोढाले व वैभव आवारी आणि एच एस सी मेरीट अवॉर्ड कु. काजल कोचर या विद्यार्थ्यांना मान्यवरांचा हस्ते प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन सौ. प्रनोती खडसे व तेजस्विनी झाडे यांनी संयुक्तरित्या केले व आभार प्रदर्शन प्रफुल महारतळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना परिश्रम घेतले.
Discussion about this post