यवतमाळ:
पुसद मार्गावरील पोफळी परिसरातील गोळ फाट्यावर नाकाबंदी असताना एक संशयित कार पोलिसांना दिसली, त्या कारमधे पोलीस लिहलेली पाटी होती. ही कार पोलिसांनी थांबवली आणि संशयितांना ताब्यात घेतले आणि चौकशी करत असताना तिघेही रेतीचोर असल्याचे समोर आले. यांच्या जवळून एल सी बी पथकाने ७ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. लाल रंगाची कार क्र. एम एच ३१ एच २८२१ यात पोलीस लीहलेली पाटी दिसली त्यात काही जण संशयित होत, त्यावरून एल सी बी पथकाने कार थांबाऊन सय्यद मुसबिर,शेख खालिद,सलीम खान यांना अटक केली.
Discussion about this post