खांडबारा (प्रतिनिधी )
आज रविवारी दिनांक 5 / 1 / 2025 वार रविवार रोजी सकाळी ठिक ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत रक्तदानाचे आयोजन केले होते.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांना तर्फे दर वर्षी रक्तदान कॅम्प आयोजित करत असते. या ही वर्षी संपूर्ण महाराष्ट्र व इतर चार राज्यातील काही जिल्ह्यातून एक लाख रक्त पिशवी संकलन करून समाजातील गरजवंतांचा प्राण वाचवणेचे गुरुमाऊलींचे स्वप्न आहे.
जगद्गुरूंच्या आवाहनाला प्रतिसाद देत खांडबारा ग्रामपंचायत सभागृह येथे आज 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी उपसरपंच योगेश चौधरी,माजी उपसरपंच मोहन गिरासे, लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्ट अध्यक्ष शैलेश गावीत, महेश धारप,छोटु शिंपी
तसेच ज्योतीसिंग चौरे, (जिल्हाध्यक्ष.) शिवा सूर्यवंशी, (जिल्हा निरीक्षक) विजय सोनवणे (ब्लड इन नीड प्रमुख) वेदांत देसले (ब्लड कॅम्प प्रमुख) कांतीलाल पवार (जिल्हा सचिव) सौ शितलताई देसले (जिल्हा महिला प्रमुख) प्रमोद भावसार (प्रोटोकॉल) प्रभाकर सोनार, बंडूभाऊ भावसार ,जिल्हा रुग्णालय नंदुरबार रक्त बँक प्रमुख डॉ. रमा वाडीकर.आदी उपस्थित होते.
Discussion about this post