प्रतिनिधी-रमेश गवळी(9422901714)
पिंपळकोठें| मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे जनता विद्यालय पिंपळकोठें विद्यालयाची शैक्षणिक सहल जेजुरी,प्रतिबालाजी,वाईचा महागणपती,प्रतापगड,महाबळेश्वर,कोल्हापूर महालक्ष्मी दर्शन,रंकाळा तलाव, शाहू पॅलेस,ज्योतिबा, पन्हाळा किल्ला, या ठिकाणी उत्साहात संपन्न झाली.मविप्र संस्थेच्या,शालेय समिती,माता पालक शिक्षक संघ यांच्या पुर्वपरवानगीने मुख्याध्यापक श्री. घुगे टी. एम.सर यांच्या मार्गदर्शनाखाली सहल आनंददायी आणि अविस्मरणीय राहिली. एकूण दोन बस घेऊन सर्वप्रथम जेजुरी या ठिकाणी दर्शन करून प्रतिबालाजी या ठिकाणी पोहोचल्यानंतर बालाजीचे दर्शन घेतले. मंदिर पाहिले.
मंदिराची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. रात्रीच्या वेळेस वाई या ठिकाणी पोहोचल्यानंतर मुक्काम केला.सकाळी वाईच्या महागणपती चे दर्शन घेऊन प्रतापगडा कडे निघालो.प्रतापगडावर किल्ल्याची मजबूत तटबंदी पाहिली. व नंतर महाबळेश्वरला उद्यान पाहिले.नंतर वाई मार्गे कोल्हापूर पोहचलो.महालक्ष्मीचे दर्शन घेऊन रंकाळा तलाव बघितला.व त्या दिवशी कोल्हापूर येथे दुसरा मुक्काम केला.दुसऱ्या दिवशी कोल्हापूरचे असलेले वैभव म्हणजे शाहू पॅलेस या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शाहू महाराजांची असलेली कारकीर्द त्यांनी वापरलेले साहित्य किंवा वस्तू,वास्तु याबाबत सविस्तर माहिती मिळवून घेतली.त्यानंतर जोतिबा या ठिकाणी गेलो.
नंतर पन्हाळा किल्ला पहिला.संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यानंतर सायंकाळच्या परतीच्या मार्गाने पिंपळकोठें ला निघालो. अशा पद्धतीने ही सहल नियोजनबद्ध, विद्यार्थ्यांना खूपच आनंददायी व अविस्मरणीय राहिली.सहली दरम्यान विद्यार्थ्यांची जेवणाची व राहण्याची(मुक्काम)व्यवस्था व्यवस्थित करण्यात आली. सहल यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक श्री. टी.एम.घुगे सर, सहल प्रमुख श्री.बागुल सर व विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी,पालक यांचे सहकार्य लाभले.
Discussion about this post