उदगीर/कमलाकर मुळे: साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान व मराठी पञकार संघाच्या वतीने दिले जाणार्या राज्यस्तरीय पञकारिता पुरस्कार घोषित करण्यात आले आहे.रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान व उदगीर मराठी पञकार संघाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील पञकारांचा त्याच्या पञकारितील योगदानाबद्दल सन्मान केला जात असून यंदा जवळपास मागील २० वर्षांपासून कार्यरत असलेले व आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे पोलीस फ्लॅश न्यूजचे मुख्यसंपादक गणेश होळे तसेच दैनिक एकमतचे उपसंचालक व दैनिक लातूरचे वरिष्ठ उपसंपादक एजाज शेख व कळंब प्रतिनिधी सतिश टोनगे यांच्यासह पञकारितेतील योगदानाबद्दल विनायक चाकुरे,उदगीर(लोकमत) विजयकुमार बोरफळे औसा(सकाळ)संजय पाटील चाकूर(नवराष्ट्र)शिवशंकर टाक वडवळ नागनाथ ता.चाकूर (पुण्यनगरी)विजय देशमुख, निटूर ता.निलंगा यांना सन्मान चिन्ह,गौरव पञ देऊन आदर्श पञकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.दि.८ फेब्रुवारी रोजी शिवाजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मान्यवराच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.अशी माहिती रंगकर्मी प्रतिष्ठान व मराठी पञकार संघाचे अध्यक्ष बिभीषण मद्देवाड यांनी दिली आहे.रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान व मराठी पञकार संघाचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड, सचिव सिध्दार्थ सुर्यवंशी,उपाध्यक्ष प्रा.भगीरथ सगर,सदस्य नागनाथ गुट्टे,मनोहर लोहारे,ॲड.महेश मळगे,प्रा.रामदास केदार,रसुल पठाण,लक्ष्मण बेंबडे,मारोती भोसले यांनी निवडी झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
Discussion about this post