उदगीर / कमलाकर मुळे : उदगीर येथील नगर पालिकेच्या मुख्य रस्त्यावर रविवारी ता.५ जानेवारी राञी साडेनऊच्या सुमारास कारमधील तीन अनोळखी व्यक्तींनी दोघांना बेदम मारहाण केली, तसेच पाऊण तोळ्याची अंगठी व दोन तोळे सोन्याची साखळी काढून लंपास केली.याबाबत शहर पोलीस ठाण्यात राञी उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील फिर्यादी रामेश्वर विवेक कोटलवार व त्यांच भाऊ रविवारी राञी साडेनऊ जात होते.तेव्हा येथील नगर पालिकेसमोर जय जवान चौक येथे कट का मारलि असे विचारले असता कारमधील(क्र.एमएच२४बीएक्स२९०४)तीन अनोळखी व्यक्तींनी रामेश्वर यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.त्यापैकी एकाने फायबरच्या काठीने रामेश्वर व त्यांच्या भावाच्या हातावर ,डोक्यास बेदम मारहाण करून जखमी केले.रामेश्वर यांच्या हातातील सोन्याची साडेसात ग्रॅमची अंगठी काढून घेतली,तसेच त्यांच्या भावाच्या गळ्यातील दोन तोळ्याची साखळीही लंपास केली.तसेच ठार मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.
Discussion about this post