उदगीर/कमलाकर मुळे : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील ऋतुजा सुर्यवंशी व अदिती कुंडगीर या खेळाडूंची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या टेबल टेनिस महिला संघात निवड झालेली आहे.
पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ स्पर्धा मध्य प्रदेशातील रिवा येथील अवघेश प्रताप सिंग विद्यापीठ येथे होत आहेत.या स्पर्धेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उदयगिरी महाविद्यालयातील ऋतुजा सुर्यवंशी व अदिती कुंडगीर या खेळाडूंची विद्यापीठ संघात निवड झाली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे पदाधिकारी मल्लिकार्जुन मानकरी,डाॅ. रेखा रेड्डी, रामचंद्र तिरूके,ॲड.एस.टी.पाटील,डाॅ.रामप्रसाद लखोटिया,भालचंद्र चाकूरकर,तसेच प्राचार्य डाॅ.आर.के.मस्के,उपप्राचार्य डाॅ.एस.जी.पाटील,प्रा.सतिश मुंढे,प्रा.रोहन एनाडले,आदिनी अभिनंदन केले आहे.
Discussion about this post