
सुनिल वर्मा लोणार ता प्रतिनिधी :-09/01,/25
20 वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू लोणार विदर्भ मराठवाड्याच्या सीमेपासून तीन किलोमीटर अंतर असलेल्या मराठवाड्यातील पालखी मार्गावर नायरा पेट्रोल पंपासमोर एका 20 वर्षीय मोटर सायकल स्वारयुवकाचा जाग्यावरच मृत्यू झाल्याची घटना 8जानेवारी रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारासघडली. तुषार विजय राठोड (वय 20, रा.देऊळगाव कुंडपाळ) असे मृत तरुणाचे नावआहे. तुषार हा आर्मी भरतीची तयारी करतहोता. तो आपल्या नातेवाईकांना भेटून परततअसताना मोटारसायकल क्रमांक MH 28 AA2480 ही उभ्या असलेल्या बोअरवेलच्यागाडीला पाठीमागून जोरात धडकली. याअपघातात तुषारच्या डोक्याला गंभीर दुखापतझाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली; मात्र धडकएवढी जोरदार होती की, तुषारला वाचवता आले नाही. अपघातानंतर गाडीचालक लोणारच्या दिशेने पळून गेल्याचेसीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले आहे. तुषारचे वडील सेवानिवृत्त सैनिक असून, हा तरुणही सैनीक भरतीचीतयारी करत होता. अपघातामुळे एका कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करूनमृतदेह मंठा येथील रुग्णालयात पाठवण्यात येऊन गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.गाडीचालकाच्या निष्काळजीपणामुळे एका कुटुंबाचा आधारहिरावला गेला असून त्याला आईवडील एक भाऊ एक बहिण आहे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Discussion about this post