
निलंगा तालुका प्रतिनिधी:- तेलंगे सिद्धेश्वर
मौजे.कोणाळी व आचवला ता.देवणी
आज रक्षाबंधन निमित्त निलंगा विधानसभा मतदार संघाचे नेते-समाजसेवक डॉ. अरविंद भातांब्रे यांनी वीर जवान शहीद नागनाथ लोभे उमरगा(हा) यांच्या बहिनीकडून सौ. सुनीता हणमंत बिरादार रा. कोणाळी ता.देवणी व द्वितीय भगिनी,सौ. उर्मिला श्रीधर बिरादार रा.आचवला ता. देवणी येथे त्यांच्या घरी जाऊन राखी बांधून आशीर्वाद घेतले, नाते किती घट्ट व महत्त्वाचे आहेत हे दाखवून दिले.आज त्यांचा भाऊ आपल्या सर्वांना सोडून शहीद झाले,आज नागनाथ लोभे यांची कमी त्या बहिणींना पडू नये म्हणून आम्ही सर्वजण जाऊन त्यांची जागा थोडीशी भरली ,त्यांना धीर दिला कुठल्या ही गोष्टी ची कमतरता भासल्यास भाऊ म्हणून हाक मारा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत,असा विश्वास डॉ.भातांब्रे साहेब यांनी दिला.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशिक्षण सेल लातूर-चक्रधरजी शेळक,पंचायत समिती सदस्य-महेशजी देशमुख,अरुण पाटील, इब्राहिम शेख, दिनकर मनोहर बिरादार, विष्णू ज्ञानोबा चामले, शिवाजी पोलकर.उपसरपंच नामदेव कारभारी चेअरमन गुणवंत बेंद्रे, लक्ष्मण गणपत बिरादार, गोपाळ शिंदे, चंद्रकांत बिरादार, निळकंठ बिरादार आदी मान्यवर उपस्थित होते.

Discussion about this post