मुरबाड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आण्णा साळवे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना समांतर प्रतिष्ठान तर्फे समाजभुषण पुरस्कार प्रतिष्ठान च्या वतीने जाहीर करण्यात आला. समांतर प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष एकनाथ देसले यांनी आमदार किसन कथोरे समर्थक आण्णा साळवे यांना सन 2024चा वीर हुतात्मा हिराजी पाटील जिल्हास्तरीय समाजभुषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
याबद्दल जिल्ह्यातील अनेक सामाजिक, राजकीय संघटना, पत्रकार, विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी श्री आण्णा साळवे यांचे अभिनंदन केले. गेली चोवीस वर्ष सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संस्था म्हणुन समांतर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ही एक संस्था आहे. संस्थेकडून दिले जाणारे मनाचे मनाचे नऊ पुरस्कार व पाच सन्मान जाहीर करण्यात आले आहेत.
हा सोहळा रविवार 25ऑगस्ट रोजी सायंकाळी 4वाजता कुसुमाई गार्डन साजई ता. मुरबाड. जि. ठाणे. येथे आयोजित करण्यात आला आहे. आण्णा साळवे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत मुरबाड तालुक्यात, जिल्ह्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.
त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात येणार आहे. समांतर प्रतिष्ठान च्या श्रावणोत्सव 2024या कार्यक्रमात पुरस्कार वितरण मराठी साहित्य मंडळाकडून जिल्ह्यातील दहा वाचनालयांना पुस्तके वाटप, संस्कृतिक कार्यक्रम, तसेच कवी तुळशीराम भस्मा यांच्या आदिवासी माझा या काव्य संग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
Discussion about this post