रावेर ( प्रतिनिधी)- दान करा रक्ताचे ,वाचवाल आयुष्य एखाद्याचे …देशाला दरवर्षी सुमारे ३०लाख युनिट्स इतकी रक्ताची कमतरता भासते याच कारणामुळे रक्तदान हा आपल्या कर्तृत्वाचा भाग ठरतो यांची जाणीव ठेवून रावेर येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे
रावेर येथील केशरी नंदन प्रतिष्ठान तर्फे स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने दिनांक १२ जानेवारी रविवार रोजी वेळ सकाळी १० वाजेपासून ते दुपारी ४वाजेपर्यत रक्तदान शिबीर आयोजन स्वामी विवेकानंद चौक थडा मारोती मंदिर येथे होणार आहे
तरी स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने आयोजित रक्तदान शिबीरामध्ये आपली उपस्थिती देवून रक्तदान करावे असे आवाहन केशरी नंदन प्रतिष्ठान आयोजकां कडून करण्यात आले आहे
Discussion about this post