( पोलिसांचि रात्रीला पेट्रोलिंग अत्यंत गरज असल्याच्या चर्चा )
गेल्या काही दिवसापासून महागाव तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरन निर्माण झाले आहे कधी चोरटे कशावर ताव मारतील हे जरी सांगता येणार नसले तरी पोलिसांच्या हलगर्जीपणा मुळे तर चोऱ्या होत तर नाही ना असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
महागाव तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या हिवरा संगम येथे सोमवारी रात्रीला आज्ञत चोरट्यांनी श्री दत्तकृपा ज्वेलर्स व साई ज्वेलर्स या दुकानाचे शटर चे कुलूप तोडून कपाटा मध्ये ठेवलेले चिल्लर नाणे चोरट्याने चोरून नेले पण तिजोरी मात्र ते फोडू शकले नसल्याने होणारा मोठा अनर्थ टळला असं वाटते मागील आठ दहा दिवसा अगोदर गावामध्ये मज्जित परिसरातील काही नागरिकांच्या बकऱ्या सुद्धा चोरीला गेल्याच्या चर्चा आहे चोऱ्या चे प्रमाण वाढल्यागत दिसत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे .
पोलीस प्रशासनाचा चोरट्यांना वचक राहिलेला दिसत नसल्याच्या नागरिकांमध्ये चर्चा असून चोरीसह मटका घेणाऱ्याचे प्रमाण सुद्धा हिवरा येथे वाढले आहे कधी न कधी तालुक्यात चोऱ्या होत असल्याने ज्वेलर्स वाल्यांनी दुकानात सोने व सोन्याचे आभूषणे ठेवणे बंद केले आहे त्यामुळे चोरट्यांच्या हाती मोठे घबाड लागणे ऐवजी चिल्लर पैसे मिळाल्याने काही नाही तर खिल्लारच बरे असे समजून चोरट्यांनी चोरी केली चोऱ्याचे सत्र मात्र काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसत असतानाच हिवरा येथे ज्वेलर्स मध्ये चोरी झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काही महिन्यापूर्वी चील्ली इजारा येथे धाडसी चोरी झाली होती त्यानंतरही अनेक चोऱ्याच्या घटना घडल्या आहेत पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये पोलिसांनी आता रात्रीची गस्त सुरू करणे गरजेचे असल्याचे जागरुक नागरिकांतून बोलल्या जात आहे.
Discussion about this post