
प्रतिनिधी :
चंद्रपूर: येथील तुळशीनगर महिला विकास समिती तर्फे जागतिक महिला दिनाचे आयोजन दिनांक ०८ मार्च २०२५ रोजी शनिवारी करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मागील २५ वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात आपली रुग्णसेवा देणाऱ्या, निमा वुमेन्स फोरम चंद्रपूरच्या अध्यक्षा तथा संकल्प ज्ञानपीठच्या संचालिका डॉ. सिमला गार्जलावार आणि उद्घाटक म्हणून डॉ.प्रतिभा खोब्रागडे यांनी मंचावर उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून तुळशीनगर महिला विकास समितीच्या अध्यक्षा ममता रामटेके, उपाध्यक्ष शांता धांडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उद्घघाटिका डॉ.प्रतिभा खोब्रागडे यांनी सावित्रीमाई फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकीत,अंगावर फेकून मारलेल्या शेणापासून सुरू झालेला प्रवास तिने पेनावर आणून संपवला आणि स्त्री जातीवर अनंत उपकार करून ठेवले.तिच्यासाठी ना तू श्रावणातले सोमवार ना मार्गशीर्षातले गुरुवार केले,
पण तरी तुझ्या पदरात बघ साऊने उडण्याचे दान दिले.विद्येची खरी देवता,स्त्री शिक्षणाची जननी,महात्मा ज्योतिबा फुलेंसारख्या क्रांतीसुर्याला तितक्याच प्रखरतेने साथ देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाईच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून.आजच्या महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाही.पुरुषांप्रमाणे महिलांनी देखील प्रगती साधली.चांद्या ते बांध्या पर्यंत स्त्रीने आपले अस्तित्व सिद्ध करून दाखवले आहे.असे उपस्थित महिलांना आपल्या अभिभाषनातून मनोगत व्यक्त केले..

डॉ. सिमला गार्जलावार यांनी मार्गदर्शन पर भाषणात सांगितले की, आजच्या काळात महिला सबलीकरण हा केवळ सामाजिक विषय नसून तो देशाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय प्रगतीचा आधारस्तंभ ठरत आहे. महिला सबलीकरण म्हणजे महिलांना त्यांच्या हक्कांचे संरक्षण, स्वातंत्र्य आणि समान संधी मिळवून देणे. हे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या विकासासाठी आवश्यक आहे. महिलांसाठी (लैंगिक छळविरोधी) कायदा, कडक शिक्षांच्या तरतुदी, स्त्री भ्रूणहत्या प्रतिबंध, हुंडाबळी विरोधी कायदे प्रभावी अंमलबजावणीसह लागू करण्यात आले आहे. अशी उपयुक्त माहिती दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता तुळशी नगर मधील सर्व मैत्रीनी सौ. विना देवतळे, सिंधू वारजूरकर,रोशनी बकसेरीया, समता डुबडुबे,किशोरी राऊत, वंदना तोळे, विजया कामडी, मिनाक्षी साव, रशिका मानकर,प्रेमिला भोई,ज्योती भोई, हिना रामटेके, पल्लवी देवगडे, रोशनी रामटेके, मंजू जुनघरे, प्रज्ञा आमटे, शारदा भोयर,श्रुती कांबळे,माला रामटेके,कल्पना निमगडे, ममता रामटेके, शांता धांडे, विना देवतळे ,सिंधू वारजूरकर, समता डुबडुबे किशोरी राऊत, वंदना तोळे, विजया कामडी, मिनाक्षी साव, रशिका मानकर, प्रेमिला भोई, ज्योती भोई, हिना रामटेके, पल्लवी देवगडे ,रोशनी रामटेके, मंजू जुनघरे,प्रज्ञा आमटे ,शारदा भोयर, माला रामटेके, रमा कांबळे ,कल्पना निमगडे,प्रभा वाघमारे इत्यादी तुळशी नगर मधील मैत्रीनी व तसेच लक्ष्मी नगर वडगांव च्या महिला किरण कांबळे, माया डोईफोडे,पुष्पा मुळे, संगीता मेश्राम, कुसुम भैसारे उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमाची सुनियोजित रचना,साहित्य,चित्रफीत, कार्यक्रमाचे सुसज्ज नियोजन हाताळण्याचे कार्य..
Discussion about this post