ग्रा. वि. अधिकारी अतुल नारायण इरनक यांना निलंबित करा यासाठी आमरण उपोषण…!
शिरदवाड ता:- शिरोळ येथिल तत्कालीन ग्रा. वि. अधिकारी अतुल नारायण इरनक
हे शिरदवाड मध्ये सन २०२१-२२ या काळात 92 लाखाचा भ्रष्टाचार केला आहे. अशी माहिती पंचायत समिती शिरोळ यांनी जिल्हा परिषद यांना माहिती दिली असून तसे सिद्ध झाले आहे.
तरी याबाबत कोणती कारवाई झाली आहे? त्याच बरोबर याची माहिती 25 जानेवारी 2025 रोजी अखेर मिळावी व त्यांना निलंबित हि करण्यात यावे असे निवेदनात शिरदवाड ग्रामपंचायत सदस्य माननीय महादेव कुंभार यांनी म्हटले आहे. अन्यथा जिल्हा परिषद कोल्हापूर येथे आमरण उपोषणास बसणार आहेत. याची नोंद घ्यावी असे निवेदन दिले आहे.
Discussion about this post