- खालापूर तहसील, कर्जत आरोग्य विभाग, खालापूर-कर्जत पंचायत समिती, कर्जत प्रातांधिकारी कार्यालयासह शासकीय विभागांविरोधात बातमी लावल्याने शासकीय अधिकारी रचत आहेत कटकारस्थान?
खालापूर / प्रतिनिधी :- छत्तीसगढ येथील पत्रकार मुकेश चंद्रकार यांची नुकतीच हत्या करण्यात आली…यापूर्वी रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारीसे यांचा ही खून करण्यात आला होता. नागरिकांसोबत होत असलेला अन्याय, अत्याचार…भ्रष्ट्राचार…अवैध व्यवसाय…आदींबाबत आवाज उठविल्याने पत्रकारांची हत्या करण्याचा नवा फंडा सध्या देशभरात सुरू आहे. खालापूर व रायगडातील अनुभवी, ईमानदार पत्रकार…स्वदेश न्यूजचे महाराष्ट्र हेड रिपोर्टर…
न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष…दैनिक कोकण प्रदेश न्यूज, दैनिक कोकण प्रजा, कोकण प्रवाह, इंटरपोल व केपी न्यूज चैनल वेब पोर्टल, युट्युब चैनल व ब्लॉगस्पॉटचे मुख्य संपादक फिरोज पिंजारी यांच्याबद्दल देखील अशीच व्युहरचना आखण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक काळात जनतेची कामे होत नसल्याने तसेच जनतेच्या पैशांचे नुकसान होत असल्याने संपादक फिरोज पिंजारी यांनी आपल्या ‘केपी न्यूज ब्लॉगस्पॉट’मध्ये बातमी प्रकाशित केली होती. या बातमीचा राग मनात ठेवून त्यांना देशोधडीला लावण्याची व्युहरचना संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून काही दलालांना सोबत घेवून आखण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या झाल्या आणि खालापूर व कर्जत तालुक्यातील परिस्थिती बदलली. राज्यघटना…लोकशाही व जनतेच्या कामांपेक्षा अधिकारी स्वत:ला मोठे समजू लागले. कर्जत विधानसभा मतदार संघात अघोषित आणीबाणी लावण्यात आली आहे. विरोधात बातमी प्रकाशित करणाऱ्या पत्रकारांना ‘दहशतवादी’ ठरविण्याचा…त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरूंगात डांबण्याचा अथवा त्यांची हत्या करून त्यांचा आवाज कायमचा बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी स्थानिक पोलिस प्रशासन, लोकप्रतिनिधी, ठेकेदार व दलाल पत्रकार तसेच गावगुंडांची मदत घेण्यात येत आहे. कायद्याची मोडतोड करीत ‘ब्लॉगस्पॉट’वर बातमी प्रकाशित केल्याबद्दल संपादक फिरोज पिंजारी यांना धडा शिकविण्यासाठी खालापूर तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
संपादक फिरोज पिंजारी यांनी आपल्या मिडीयातून अवैध उत्खनन व भराव…महसुलातील गैरप्रकार… शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची मनमानी…नगर परिषदेत जनतेची होणारी पिळवणूक…मान्यता नसताना डॉक्टरकडून सुरू असलेली प्रॅक्टिस…पंतप्रधान मातृ वंदन योजनेतील भ्रष्ट्राचार…तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे…अशा एकापेक्षा एक विषयांबाबत आवाज उठविलेला आहे. त्यामुळे तहसिलदार, निवासी नायब तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, प्रातांधिकारी, पोलिस निरीक्षक, डिवायएसपी, आरोग्य अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्राम सेवक, आरोग्य अधिकारी…महसूल, तहसील, नगर परिषद, पंचायत समिती, पोलिस विभाग, प्रातांधिकारी यातील अधिकारी व कर्मचारी संपादक फिरोज पिंजारी यांना आपला शत्रू समजतात. संपादक फिरोज पिंजारी यांच्याबद्दल शत्रुत्व बाळगून त्यांना आपल्या मार्गांतून हटविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
संपादक फिरोज पिंजारी यांनी बातम्या प्रकाशित केल्याबद्दल तर निवासी नायब तहसिलदार यांची विभागीय चौकशी लावल्याबद्दल साप्ताहीक खालापूर वार्ताचे संपादक सुधीर माने…कर्जत पंचायत समिती व आरोग्य विभागातील भ्रष्ट्राचारसमोर आणल्याबद्दल, शासकीय कार्यालयांबाबत विविध तक्रारी व अर्ज केल्याबद्दल अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (एबीजेएफ) रायगड जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार राजेंद्र शिवाजी जाधव…खोपोली नगर परिषद, खालापूर तहसील कार्यालय, पोलिस विभाग यांच्या विरोधात बातमी प्रकाशित केल्याबद्दल तसेच अवैध उत्खनन व भरावाबद्दल तक्रार केल्याप्रकरणी, शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडतोय म्हणून आवाज उठविल्याने पत्रकार खलील सुर्वे आदींबद्दल देखील संबंधित अधिकारी व कर्मचारी मनात राग ठेवून आहेत. त्यांना संपविण्यासाठी विविध आयडीया लावल्या जात आहेत. काही दलाल पत्रकार… लोकप्रतिनिधी, नेते, ठेकेदार यांना हाताशी धरून खालापूर व कर्जत तालुक्यात विरोधात बातमी प्रकाशित करणाऱ्या…आवाज उठविणाऱ्या पत्रकारांना जीवे मारण्याचा कट शिजत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Discussion about this post