


स्थानिक : अमरावती दि १० मार्च २०२५..
रविवार दिनांक 9 मार्च 2025 रोजी श्री. गाडगे महाराज प्राथमिक शाळा शिवाजीनगर अमरावती येथे संघर्ष संस्था अंतर्गत क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन व श्री. शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित, श्री गाडगे महाराज प्राथमिक शाळा अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मृतिदिनानिमित्त रंगभरण स्पर्धा कार्यक्रम थाटात संपन्न झाला. मातृभाषेतूनच शिक्षणाचा पाया दृढ होणे शक्य आहे!! असे मत मा. डॉ. मनीषा जाधव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका यांनी व्यक्त केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक मा. यशपाल वरठे (सेवानिवृत्त प्राचार्य), कार्यक्रमाचे अध्यक्षा डॉ. मनिषा ताई जाधव (इथापे) (राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका) प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. प्रसाद देशमुख(मुख्याध्यापक शिवाजी हायस्कुल), सौ.माधुरी देशमुख (प्राध्यापिका शिवाजी बी. एड.) सौ. रेणुका कापूसकर(समाजसेविका) सौ. सुजाता गणेश (अध्यक्ष वसुंधरा शहर स्तर संघ अम.). सौ. हर्षा सगने(सचिव संघर्ष संस्था), श्री. दिलीप लाडे (समन्वयक क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन), सौ. पूजा रडके (उद्योजक ), श्री. भाई प्रफुल्ल कुकडे (सामाजिक कार्यकर्ता ), श्री. संदीप यादव मुख्याध्यापक श्री. गाडगे महाराज प्राथमिक शाळा.) यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या उद्घघाटन प्रसंगी मान्यवरांनी संस्थेच्या उपक्रमाबद्दल मार्गदर्शन करून संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली.
जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्वशील महिला भगिनींचा कार्यगौरव सन्मान करण्यात आला त्यामध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, समाजसेवक, बचत गटातील महिला, उद्योजक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या महिला तसेच इतर क्षेत्रात कार्य करणाऱ्या १०० महिलांचा सन्मान करण्यात आला, सोबतच रंगभरण स्पर्धा घेण्यात आली यात १९८ बालक, शालेय विद्यार्थी यांनी सहभाग घेतला स्पर्धेकरिता आलेले सर्व शालेय विदयार्थी आणि त्यांचे पालक यांनी भरघोस प्रतिसाद दिला. तसेच कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षिका चंदा गजभिये, प्रिती सरदार, प्राप्ती गवळी, अदिती हरणे, जी.एल.रेखे सर , अनिल ईसाने, रुपाली डोंगरे, क्रांती युवा स्वयंसेवक टीम व क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन चे मनिष गणेशपुरे, दिगंबर मेश्राम,शुभम दमाहे, आशिष देशमुख,कृष्णा दूरतकर, विजया करोले, श्वेता बारड,आम्रपाली रंगारी, रंजना भगत, भार्गवी कोचेकर, तनुश्री घरडे, स्पंदनकुमार , पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्त्यांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे संचालन चंदा गजभिये (शिक्षिका) यांनी तर आभार प्रदर्शन दिलीप लाडे यांनी केले आणि आशिष देशमुख यांनी पत्रकाद्वारे कळविले आले.
प्रती,
मा. संपादक,
दैनिक. ..,,……… अमरावती.
महोदय,
वरील बातमी आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रांमधून प्रकाशित करावे ही विनंती.
आशिष देशमुख (जिल्हा अध्यक्ष)
क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन..
Discussion about this post