
परिक्रमा शैक्षणिक संकुलनाची महिला खेळाडू व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत असलेलली कु.सिद्धी संतोष शिर्के हिने भुवनेश्वर येथे झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ सायकलिंग ट्रॅक इव्हेंट या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत कास्यपदक मिळवले .सिद्धी ही परिक्रमा शैक्षणिक संकुलनातील अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू आहे. तिच्या या यशाबद्दल परिक्रमा शैक्षणिक संकुलनाचे संस्थापक,माजी मंत्री,मा.श्री.बबनरावजी(दादा)पाचपुते,अध्यक्षा डॉ.सौ.प्रतिभाताई पाचपुते,सचिव आमदार श्री.विक्रमसिंह बबनरावजी पाचपुते,मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड.प्रतापसिंह बबनरावजी पाचपुते, अकॅडमीक डायरेक्टर प्रा.सौ.इंद्रायणी पाचपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.अनिल पुंड,डेप्युटी डायरेक्टर डॉ.प्रा.संजीव कदम पाटील, प्राचार्य मोहन धगाटे,प्राचार्य डॉ.सुनील निर्मळ, प्राचार्य डॉ.सुदर्शन गिरमकर,प्राचार्य डॉ.रमेश शिंदे,प्राचार्य डॉ.प्रशांत सूर्यवंशी,प्राचार्य डॉ.पांडुरंग इथापे यांनी सिद्धीचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सिद्धीला परिक्रमा क्रीडा विभागाचे मार्गदर्शन लाभले..
Discussion about this post