विहिरगांव प्रतिनिधी:-रजत चांदेकर

राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे सकल संत निर्णायक ज्ञान मंदिर कुंभार तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ येथील सद्गुरु श्री अनंत महाराज यांचे रिधोरा येथे दिनांक १२ जानेवारी रोजी रविवार जाहीर कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर या कार्यक्रमाची रूपरेषा दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत रिधोरा येथील गुरुदेव सेवा मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रम तर सायंकाळी ५:३० वा. सामुदायिक प्रार्थना तर ६ ते ३०वा. प्रवचन गुरुभक्त भास्कर पारखी तर सायंकाळी ६ ते ३०वा. प्रवचन विष्णुदास बावणे तर ७ ते ८:१५वा. किर्तन गुरुभक्त रमाकांत माढरे तर ८:१५ ते १० वाजेपर्यंत किर्तन श्री सद्गुरु अनंत महाराज यांचे सुमधुर वाणीतून जाहीर कीर्तन होणार आहे. तरी या कीर्तनाचा रिधोरासह परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान अखिल गुरुदेव सेवा मंडळ रिधोर व समस्त गुरुभक्त मंडळी रिधोरा यांनी केले आहे
Discussion about this post