
✒️पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ✒️
संपर्क 📲9423170716
गडचिरोली — गडचिरोली जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा अधिकारी अविशांत पांडा यांचे भाजपा अनु. जनजमाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोकजी नेते यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या भेटी दरम्यान अशोक नेते यांनी जिल्हा अधिकारी सोबत गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पाबद्दल चर्चा केली. गडचिरोलीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने विविध मुद्द्यांवर सखोल विचार विनिमय करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम यांचीही उपस्थिती होती. या भेटीत जिल्ह्यातील विकास कामाला गती देण्यासाठी महत्वपूर्ण दिशानिर्देश निश्चित होण्याची अपेक्षा आहे..
Discussion about this post