*अखेर ग्रामसेवक झाला निलंबीत*
अधिकार नसताना दाखला दिला, जिल्हा परिषद चौकशी मध्ये दोषी, पोलिसांकडून चौकशी पूर्ण होई पर्यत निलंबन व मंडणगड येथील पंचायत समिती मध्ये हजेरी लावण्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी काढला आहे.
तत्कालीन ग्रामविकास अधिकारी हे सदर प्रकरणी प्रथमदर्शनी दोषी आढळूण येत असून ते शासकीय पदावर कार्यरत राहिल्यास त्यामुळे चौकशीमध्ये बाधा उत्पन्न होण्याची शक्यता असल्याचे प्रथमदर्शनी दिसुन येत आहे. त्याकारणास्तव श्री. वासुदेव शामराव सावके, विद्यमान विस्तार अधिकारी (पं.) यांना महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम, १९६४ मधील ३ (१) (ब) नुसार जिल्हा परिषद सेवेतुन निलंबित करण्यात येत आहे.
. वासुदेव शामराव सावके, विस्तार अधिकारी (पं.), पंचायत समिती, दापोली यांचे निलंबन कालावधीत पंचायत समिती, मंडणगड हे ठिकाण मुख्यालय राहिल.
आदेश
ग्रामपंचायत शिरगांव, ता.जि. रत्नागिरी येथे सन २०२० मध्ये श्री. मोहम्मद इंद्रीस इसाक शेख यांना ते पडवेकर कॉलनी, उद्यमनगर, ता.जि. रत्नागिरी येथे रहात असून त्यांचा जन्म दि.०१.०५.१९८३ रोजी झालेला असलेबाबत जन्म दाखला दि.०४.०३.२०२० रोजी देण्यात आलेला आहे.
सदरबाबत दि.०६.०१.२०२५ रोजीचे वृत्तपत्रामध्ये बातमी देण्यात आलेली असून, सदर बातमीनुसार “श्री. मोहम्मद इद्रीस शेख, रा. पडवेकर कॉलनी, उद्यमनगर, ता. जि.रत्नागिरी हे बांग्लादेशीय नागरीक असून त्यांना ग्रामपंचायतीमार्फत खोटा दाखला दिलेला असलेबाबत नमुद करण्यात आलेले आहे.
त्यानुसार गट विकास अधिकारी, पंचायत समिती, रत्नागिरी यांना तात्काळ चौकशी करण्यात येऊन अहवाल सादर करणेबाबत वाचले क्र.२ अन्वये कळविण्यात आलेले होते. त्यानुसार वाचले क्र.३ अन्वये गट विकास अधिकारी, पंचायत समिती, रत्नागिरी यांचा अहवाल वाचले क्र.३ अन्वये प्राप्त झालेला आहे.
सदर अहवालाचे अवलोकन करता, ग्रामपंचायत शिरगांव, ता.जि.रत्नागिरी येथे तत्कालीन कालावधीत श्री. वासुदेव शामराव सावके हे ग्रामविकास अधिकारी कार्यरत होते व सद्यस्थितीत ते पदोन्नतीने विस्तार अधिकारी (पंचायत) या पदावर पंचायत समिती, दापोली येथे कार्यरत आहेत.
तसेच प्रकरणी तत्कालीन कागदपत्रांची पडताळणी केली असता, श्री. वासुदेव शामराव सावके, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांनी सदरचा जन्म दाखला दिलेला असल्याचे दिसुन येत आहे.
श्री. मोहम्मद ईद्रीस इसाक शेख यांना देण्यात आलेला जन्माचा दाखला १९८३ मधील असून सदरचा दाखला दि.०४.०३.२०२० रोजी देण्यात आलेला आहे; याबाबत मा.उप संचालक, आरोग्य सेवा तथा उपमुख्य निबंधक जन्म व मृत्यु यांचेकडील परिपत्रक क्र. आमाजीआ/ कक्ष-८३/उशिरा नोंद सुधारीत आदेश/५०४-३८/१४, दि.२०.०१.२०१४ नुसार सदरचा दाखला देण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला नसल्याने श्री. सावके, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांनी
श्री. मोहम्मद ईद्रीस इसाक शेख यांना देण्यात आलेला जन्माचा दाखला १९८३ मधील असून सदरचा दाखला दि.०४.०३.२०२० रोजी देण्यात आलेला आहे; याबाबत मा.उप संचालक, आरोग्य सेवा तथा उपमुख्य निबंधक जन्म व मृत्यु यांचेकडील परिपत्रक क्र. आमाजीआ/ कक्ष-८३/उशिरा नोंद सुधारीत आदेश/५०४-३८/१४, दि.२०.०१.२०१४ नुसार सदरचा दाखला देण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला नसल्याने श्री. सावके, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांनी नियमांचे उल्लघन करून सदरचा दाखला दिलेला असल्याचे अहवालामध्ये नमुद करण्यात आलेले आहे. तसेच श्री. प्रशांत सनगरे, वसुली लिपिक (ग्रामपंचायत कर्मचारी), ग्रामपंचायत शिरगांव, ता.जि. रत्नागिरी यांनी त्यांचा दि.०६.०१.२०२५ रोजीचा जबाब कार्यालयाकडे सादर केलेला असून, सदर जबाबामध्ये उपरोक्तनुसार दाखला देणेकरीता दि.१८.०२.२०२० रोजीचे मासिक सभेच्या इतिवृत्तामध्ये व ठरावामध्ये सदरची नोंद केलेली असून सदरची नोंद श्री. सावके, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांचे सांगण्यावरून नंतर हून केलेली असल्याचे नमुद केलेले आहे.
यावरून श्री. वासुदेव शामराव सावके, विद्यमान विस्तार अधिकारी (पं.) तथा तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांनी आपले कर्तव्यात कसूर करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणुक) नियम, १९६७ मधील नियम ३ चा भंग करून आपले कर्तव्यामध्ये कर्तव्यपारायणता राखलेली नसल्याचे प्रथमदर्शनी सिध्द होत आहे.
तसेच सदर प्रकरणी पोलीस निरिक्षक, ग्रुप्रशा, गुअवि, कक्ष-१, मुंबई यांचेमार्फत चौकशी सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. करीता श्री. वासुदेव शामराव सावके, विद्यमान विस्तार अधिकारी (पं.) तथा तत्कालीन ग्रामविकास अधिकारी हे सदर प्रकरणी प्रथमदर्शनी दोषी आढळूण येत असून ते शासकीय पदावर कार्यरत राहिल्यास त्यामुळे चौकशीमध्ये बाधा उत्पन्न होण्याची शक्यता असल्याचे प्रथमदर्शनी दिसुन येत आहे.
त्याकारणास्तव श्री. वासुदेव शामराव सावके, विद्यमान विस्तार अधिकारी (पं.) यांना महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम, १९६४ मधील ३ (१) (ब) नुसार जिल्हा परिषद सेवेतुन निलंबित करण्यात येत आहे.
श्री. वासुदेव शामराव सावके, विस्तार अधिकारी (पं.), पंचायत समिती, दापोली यांना निलंबन कालावधीत महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेस्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे या काळातील प्रदाने) नियम १९८१ नियम ६८ (१) (ए) नुसार निर्वाह भत्ता अनुज्ञेय राहील. निलंबन कालावधीत अनुज्ञेय पूरक भत्ता उदा. घरभाडे भत्ता पूर्णपणे देणेत यावा.
श्री. वासुदेव शामराव सावके, विस्तार अधिकारी (पं.), पंचायत समिती, दापोली यांचे निलंबन कालावधीत पंचायत समिती, मंडणगड हे ठिकाण मुख्यालय राहिल.
श्री. वासुदेव शामराव सावके, विस्तार अधिकारी (पं.), पंचायत समिती, दापोली यांचे निलंबन कालावधीत पंचायत समिती, मंडणगड हे ठिकाण मुख्यालय राहिल. सदर निलंबन भत्ता महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेस्तर सेवा, अणि निलंबन, बडतर्फ व सेवेतून काढून टाकणे त्यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ चा ६९ (४) नुसार प्रत्येक महिन्याला ते स्वतः कोणतीही खाजगी नोकरी किंवा कोणताही धंदा अथवा व्यापार केलेला नसल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच काढणेत यावा. खोटे प्रमाणपत्र सादर केल्यास गैरवर्तणुकीचे कृत्य असल्याचे मानण्यात येईल याची नोंद घ्यावी.
गट विकास अधिकारी, पंचायत समिती, दापोली यांनी श्री. वासुदेव शामराव सावके, विस्तार अधिकारी (पं.) यांचे निलंबन कालावधीतील निर्वाह भत्ता काढताना ते मुख्यालयात रहात असल्याची खात्री करुन घ्यावी व नंतरच भत्ता काढण्यात यावा. त्यासाठी होणारा खर्च त्यांचे वेतन/भत्ते ज्या लेखाशिर्षांखाली खर्च घालण्यात येतो त्या लेखाशिर्षाखाली खर्च घालणेत यावा.
सही/- (किर्ता किरण पुजार, भाप्रसे) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी
_____________________
संपादक: सागर गोवळे.
Discussion about this post