प्रतिनिधी:- कैलासराजे घरत
अखिल पेण तालुका प्राथमिक शिक्षक संघ आयोजित शिक्षक संघ वर्धापन दिन निमित्त गुणवंत शिक्षक पुरस्कार, आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा आणि सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा आगरी समाज हॉल पेण येथे आयोजित करण्यात आला होता… अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष श्री प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या कार्यक्रमासाठी राज्यसभा खासदार श्री धैर्यशील पाटील, पेण विधानसभा आमदार श्री.रविशेठ पाटील, माजी रा. जि. प. अर्थ व बांधकाम सभापती ॲड सौ. निलीमाताई पाटील, रा.जि.प.सदस्य श्री.प्रभाकर शेठ म्हात्रे, जिल्हा उपशिक्षणाधिकारी श्री सुनील भोपळे, पेण गटशिक्षणाधिकारी श्रीम. अरुणा मोरे, नगरसेवक श्री.शोमेर पेणकर, पेण पतपेढी चेअरमन श्री विठोबा पाटील, पेण पतपेढी संचालक श्री मोहन भोईर, अखिल रायगड सेवावृत्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री अमरचंद पाटील, अखिल रायगड जिल्हा प्रा. शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष श्री आदिनाथ पाटील , सल्लागार श्री किशोर पाटील, सौ. सरिता पाटील , तालुक्यातील सर्व केंद्र प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात पेण तालुक्यातील १७ केंद्रातील प्रत्येकी एका गुणवंत शिक्षका ला “गुणवंत शिक्षक पुरस्कार, प्रत्येक बीटातून एक उच्च प्राथमिक व एक प्राथमिक आदर्श शाळा पुरस्कार तसेच मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा पुरस्कार विजेत्या शाळांना पुररकार प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले. तसेच सन २०२४ मधील सेवा निवृत्त प्राथ. शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांचा देखील सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल पेण तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा जयश्री सावंत, सरचिटणीस प्रवीण पाटील कोषाध्यक्षा राजश्री पेरवी , सल्लागार राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष टिळक म्हात्रे , उपाध्यक्ष हरिश्चंद्र तांबोळी, हरिश्चंद्र तुरे, गजानन पाटील, सदानंद म्हात्रे, संघटक मनोज पाटील, दिनेश बळवंत पाटील, अजित कोठेकर, किशोर रा. पाटील,वैशाली वर्तक, वर्षा वाघमारे, मानसी भोईर, गणेश म्हात्रे, आदिती पाटील,नरेंद्र भोईर, प्रगती बिडकर, दीपक ढोणुक्षे, मदन मुगळे, राजेंद्र दा. पाटील, प्रदीप वाघ, धनेश पाटील, शिल्पा कोठेकर आणि अखिल पेण तालुका शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मेहनत घेतली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विनोद म्हात्रे यांनी केले.तर आपल्या बहारदार आवाजात श्री. प्रविण पाटील सरचिटणीस यांनी भक्तीगीत, नाट्यगीत ईशस्तवन, स्वागतगीत व अखिल गीत सादर करून कार्यक्रम उच्च स्तानावर नेले व श्रोत्यांची मने जिंकली.
या कार्यक्रमासाठी तालुक्यातील शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Discussion about this post