प्रतिनिधी:- कैलासराजे घरत
अखिल पेण तालुका प्राथमिक शिक्षक संघ आयोजित शिक्षक संघ वर्धापन दिन निमित्त गुणवंत शिक्षक पुरस्कार, आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा आणि सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा आगरी समाज हॉल पेण येथे आयोजित करण्यात आला होता…
जिते केंद्रातील शाळा वडमाळवाडीचे शाळा प्रमुख, तंत्रस्नेही शिक्षक, सर्वांशी प्रेमाने व आपुलकीने बोलणारे, कोणत्याही कामाचा कधीच त्रास न मानणारे, सर्वांना मदत करणारे, आदर्श शिक्षक, केंद्रप्रमुख, सर्वांचे लाडके श्री. मंगेशजी कांबळे सर सन 2024-25 चा अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आपले मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन!!
जिते केंद्राचे हरहुन्नरी, विद्यार्थी प्रिय, तंत्रस्नेही,केंद्रप्रमुख बहारदार,खुशबूदार तसेच दिलदार व्यक्तिमत्व ज्यांनी आतापर्यंत आपली अविरत सेवा विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठीच खर्च केली यापुढेही अशीच सेवा देऊन ते आपले नाव लौकिक करतील यात शंका नाही. अशा अलौकिक व्यक्तिमत्वाचे मनापासून खूप खूप अभिनंदन. मंगेश कांबळे सर यांनी शून्यातून सुरुवात करून आपल्या कर्तबगारीच्या जोरावर पेण तालुक्यातील १७ केंद्रातील प्रत्येकी एका गुणवंत शिक्षकाला “गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यापैकी एक म्हणजे मंगेश रमेश कांबळे सर यावेळी त्यांचे सर्व कुटुंबीय मित्रपरिवार आणि सर्व सहकारी शिक्षक उपस्थित होते.
त्यांच्या या यशाबद्दल सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विजेते पत्रकार श्री कैलास राजे निर्मला कमलाकर घरत यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या पुरस्कारामुळे त्यांचे सर्वच खारपाडा, दुष्मि, ठाकूरपाडा, वडमालवाडी, खैरासवाडी पंचक्रोशीतील सर्व पालक विद्यार्थी आणि ग्रामस्थांकडून तसेच
सामाजिक, शैक्षणिक आणि क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांनी यापुढे देखील यशाची अशीच नव नवीन शिखरे पादाक्रांत करत राहावी हीच सदिच्छा.


Discussion about this post