नाशिक जिल्हा प्रतिनिधी -अमित गाडे
नाशिक शहर पोलिस दलातर्फे ‘स्टॉप अँड सर्च’ मोहीम नियमितपणे राबविण्यात येते. अशाच एका अभियानात 7 जानेवारी रोजी मध्यरात्री एका कारचा पाठलाग करीत संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करीत ड्रग्ज तस्करांना पकडण्यात आले. 8 मोबाईल व्हॅन्सच्या माध्यमातून हा संपूर्ण थरार कॅमेरात कैद आहे. या कारवाईत सुमारे 28 किलो गांजा पकडण्यात आला. नाशिक पोलिसांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्त्वात भाऊराव गांगुर्डे आणि बाळकृष्ण पवार यांनी ही कारवाई केली. या मोहीमेतील सर्वांचे अभिनंदन !
Discussion about this post