उदगीर/ कमलाकर मुळे :
जन्म: १२ जानेवारी इ.स.१५९८
सिंदखेडचे लखुजी जाधव व म्हाळसाबाई यांची कन्या. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते, जिजाऊंची जन्मदात्री माऊली म्हाळसाबाई तसेच सावत्र माता यमुनाबाई आणि सावित्रीबाई ह्या सर्वांनी जिजाऊंचे संगोपन अगदी उत्कृष्टरित्या केले व म्हाळसाबाई मुळे त्यांच्यावर प्रशासकिय कार्याचे संस्कार घडले, चार थोरल्या भावंडां समान त्यांना देखील उत्तम तलवार बाजीचे प्रशिक्षण लाभले, घोडस्वारीत देखील जिजाऊ तरबेज होत गेल्या…
इ.स.१६०५ मध्ये जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी पार पडला. कालांतराने आऊसाहेब १६३५ ला पुण्यात लाल महाल बांधून पुण्यातच राहू लागल्या, आदिलशाहाचा सरदार पंडित मुरार जगदेव कुलकर्णी यांने पुणे उजाड केले होतं. पुण्याच्या याच जमिनीवर गाढवाचा नांगर फिरवून जागोजागी पहारी रोवून त्यावर चप्पल बांधून जो ही जमीन नांगरेल तो निर्वंश होईल असा शाप दिलेली भूमी अवघ्या पाच वर्ष वयाच्या शिवबांच्या हातात सोन्याचा फाळ असलेला नांगर बनवून ती भूमी नांगरली. सोबत रायनाक या दलिताचा मुलगा, रामोश्याचा, मातंगाचा आणि लोहाराचा अशा पाच बालकांनी मिळून ही शापित भूमी नांगरली…
वाघोलीच्या रामेश्वर भटाचे शिष्य पुरोषत्तम भटाचा थयथयाट झाला आणि आता शिवाजी राजा मरेल अशी भिती या भटद्वांनी पेरली. आऊसाहेब अशा धमक्यांना पुरुन उरणार्या होत्या. आऊसाहेबांनी शिवबाला नांगर तसाच चालू ठेवण्यास फर्मावले. महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी निर्वंश झाले तरी चालेल परंतु महाराष्ट्राची गोरगरीब जनता उपाशी मरू देणार नाही. समतेचे, न्यायाचे, ममतेचे राज्य निर्माणासाठी वाट्टेल ते भोगण्याची माझी तयारी असल्याचे ठणकावून सांगितले…
धार्मिक दहशत पसरविणाऱ्या पुण्यातील भटांनी रोवलेल्या सर्व पहारी उघडून त्यापासून स्वराज्य निर्मितीसाठी उपयोगी पडणार्या तलवारी तयार करण्यात आल्या व पुन्हा पुण्याची पांढरी शापित भूमी कसण्यास सुरूवात झाली. अगदी धैर्याने आणि खंबीर पणे स्वराज्य स्थापनेची वाट निर्माण करणारी माऊली आपल्या महाराष्ट्राला लाभली, सदैव नतमस्तक तिच्या चरणाशी हा माथा…💐🙏एक शिवभक्त🙏🏻🌹
Discussion about this post