मिरजेतील प्रसिद्ध खंडोबा मंदिरामध्ये श्री खंडोबा यात्रेनिमित्त विविध पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले खंडोबा किंवा खंडेराय हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील शैव पंथीय दैवत आहे.महाराष्ट्रातील अनेक घराण्यांचे कुलदैवत आहे. प्रामुख्याने क्षत्रिय धनगर, ९६ कुळी क्षत्रिय मराठे, गडरिया, वंजारी, आगरी कराडी, कुणबी, खारवी, गवळी, गोसावी, भंडारी, भोई, मल्हारकोळी, मातंग, माळी, कोळी, रामोशी (नाईक), वाडवळ, लिंगायत, सोनार समाज, गानली(रेड्डी गानलोलु), रोंडु एडला गानलोलु किंवा गानगोलु, गोलकर, बेलदार, पद्मशाली व सोनकोळी समाजांचे, तसेच कित्येक ब्राम्हण व कायस्थ प्रभू समाजांतील लोकांचे कुलदैवत मानले जाते. परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. खंडोबाच्या परिवारात म्हाळसा, बाणाई या पत्नी; हेगडे हा प्रधान (हा बाणाईचा भाऊ आहे) आणि कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो.खंडोबाच्या मूर्ती, उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, खंडा (अतिशय मोठी आणि जड तलवार) आणि पानपत्र असून तो चतुर्भुज व कपाळाला भंडारा लावलेल्या रूपात असतो.
आज यात्रेनिमित्त श्री खंडोबा आणि म्हाळसादेवी लग्न सोहळा आणि लंगर तोडण्याचा विधी संपन्न झाला या लग्नामध्ये मिरज शहरासह पंचक्रोशीतील लाखो भाविकांनी श्री खंडोबाचे दर्शन घेतले या यात्रेनिमित्त शेकडो रक्तदात्यांनि रक्तदान केले. होम मिनिस्टर हळदीकुंकू कार्यक्रम खेळ पैठणीचा असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. मगदूम आणि वैरागे बंधूनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.
Discussion about this post