फुलंब्री प्रतिनिधी : अमोल कोलते फुलंब्री :तालुकयातील गणोरी येथे श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या संप्रदायाच्या वतीने काल रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते यानिमित्त गणोरीतील ग्रामस्थांनी व पंचकुशीतील ८५बांधवांनी रक्तदान केले यावेळी रक्तदान करतानी गणोरी गावाचे शेतकरी नेते संतोष पाटील तांदळे यांनी सुद्धा रक्तदान केले व गावातील नागरिकांना विनंती केली की रक्तदान करावे रक्तदान श्रेष्ठ दान आहे..यावेळी गणोरी येथील संप्रदायाचा नागरीक व संतोष पाटील तांदळे, सुदाम गायकवाड ,संजय पुरी ,दिगंबर गायकवाड सोमनाथ उबाळे ,बाबासाहेब पेहेरकर, बाबासाहेब तांदळे, भास्कर जाधव, समाधान पेहेरकर , गजानन चव्हाण ,विरुनाथ करडे नितीन गायकवाड, संतोष हातकंगणे ,शिवाजी करडे आदी गावकरी उपस्थित होते .
Discussion about this post