पुर्णा:
चुडावा येथील रितेश ज्ञानेश्वर देसाई वय 18 वर्ष हा त्याची बहीण स्वाती लेंडंगे वय 25 वर्षे तिची एक छोटी मुलगी वय अंदाजे पाच वर्षे तर दुसरी एक चिमुकली असे चोघे मोटरसायकल क्र.एमएच 22 बीबी 8048 वरून चुडावा रोडने कलमुला गावाकडे जात असताना. पूर्णा चुडावा रोडवर ट्रॅक्टर सोबत शनिवार 11 जानेवारी रोजी रात्री 8 30 वाजता अपघात झाला. यात चौघेजण गंभीर जखमी झाले. जखमींवर नांदेड येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना. मायलेकीचा मृत्यू झाला तर दुसरी लहान मुलगी व मोटारसायकल चालक यांच्यावर उपचार सुरू आहे.
Discussion about this post