सिंधुदुर्ग प्रतिष्ठान (रजि.)मुंबई या संस्थेच्या वतीने मालवणी बोली संवर्धन आणि प्रसार करण्याच्या उपक्रमाअंतर्गत दोन नव्या मालवणी लेखकांची पुस्तके आज व्हॅली ऑफ फ्लॉवर्स क्लब, ठाकूर व्हिलेज, कांदिवली येथे शानदार सोहळ्यात प्रकाशित करण्यात आली.
प्रकाश सरवणकर यांचं ‘ गजालीतली माणसं ‘ आणि पूर्णिमा गावडे मोरजकर यांचं ‘ गजाल गाथण ‘ अशी दोन पुस्तके रसिक वाचकांच्या प्रचंड प्रतिसादात प्रकाशित करण्यात आली.
प्रकाशन सोहळ्यास सुप्रसिद्ध लेखक श्री. प्रभाकर भोगले आणि मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक, ‘अज्ञात मुंबई’ या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक श्री. नितीन साळुंखे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते.
Discussion about this post