रत्नागिरीत मनसेच्या जुन्या शिलेदारांच्या कामगिरीवर प्रभावित होऊन आणि सन्माननिय श्री.
राज ठाकरे यांच्या विकासाच्या मुद्द्यावर विश्वास ठेऊन मनसे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री. अविनाश सौदंळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपजिल्हाध्यक्ष श्री.अरविंद मालाडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि सचिन शिंदे, संपदा राणा व बाबय भाटकर यांच्या प्रयत्नाने रत्नागिरी शहरातील अनेक महिलांनी मनसे मध्ये प्रवेश केला.
श्री.राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूकिमध्ये मांडलेले विकासाचे मुद्दे पाहून भविष्यात विकास हवा असेल तर मनसेच हवी अशीच भावना घेऊन आपण आज मनसेमध्ये जाहीर प्रवेश करत असल्याचे या महिलांनी सांगितले.
यामध्ये बिस्मिला नदाफ, सानिया नदाफ,मासुमा शेख,चौडावा बडगैर,शमा मुल्ला, मंगल पाथरोट,सायरा नदाफ, समृद्धी सुर्वे,क्रांती सुर्वे, रोबर्ट यांचे सह अनेक महिलांनी आज प्रवेश केला.
या प्रसंगी उपजिल्हा अध्यक्ष अरविंद मालाडकर,कामगार सेना जिल्हाचिटणीस महेंद्र गुळेकर, मा. तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, बाबय भाटकर, विभाग अध्यक्ष शैलेश मुकादम महाराष्ट्र सैनिक स्वप्नील सुर्वे इत्यादी उपस्थित होते.
Discussion about this post