विहिरगांव प्रतिनिधी:-रजत चांदेकर

६जानेवारी 2025मध्ये वर्धा विभागाच्या वतीने युवा ग्रामीण राष्ट्रीय अधिवेशन स्वर्गीय वसंतराव नाईक सभागृह नागपुर येथे संपन्न झाले होते या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याचे व परराज्यातील अनेक जिल्ह्यातील पत्रकावर बंधू आणि भगिनी आवर्जून उपस्थित होते.. या अधिवेशनामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश भाऊ कचकलवार तर प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ जिल्हा परिषद लक्ष्मण टेकाळे , प्रभात लोढा भाजपा शहराध्यक्ष, विनोद कनाके विभागीय अध्यक्ष युवा ग्रामीण पत्रकार संघ व रोहिणी बाबर महिला विभागीय अध्यक्ष हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला पत्रकार मान्यवरांच्या हस्ते पत्रकारक्षेत्राचे जनक आचार्य बाळकृष्ण जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अभंग दीपक प्रज्वलन करण्यात आले तसेच भारतरत्न भारत रत्न, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज ,सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या प्रतिनिधी सुद्धा पूजन करण्यात आले. त्यानंतर विविध नेते भाषणे संपन्न. अनेक मान्यवर पत्रकारांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानसन्मान व सत्कार करण्यात आला. यामध्ये राळेगाव तालुक्यातील खैरी य गावात राहणारे व दैनिक पब्लिक पोस्ट या वृत्तपत्राचे पत्रकार खैरी निवासी खुशाल सिताराम वानखेडे यांचा युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश भाऊ कचकलवार व उपस्थित मान्यवरांचे श्री शाल श्रीफळ देऊन उत्कृष्ट पत्रकारिता सन्मान चिन्ह देऊन व्यासपीठावर गौरविण्यात आले …….. युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या नागपूर येथील राष्ट्रीय अधिवेशन मध्ये उत्कृष्ट पत्रकार ग्रामीण भागात राहणारे खुशाल सिताराम वानखेडे यांना ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश भाऊ कचकलवार व मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळय सन्मान चिन्ह गौरांवित करण्यात आल्याबद्दलद पब्लिक पोस्ट वृत्त समूह व राळेगाव तालुक्या सह खैरी परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनचा व कौतुकाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराबद्दल दैनिक पब्लिक पोस्ट परिवारासह राळेगाव तालुका व खैरी वडकी परिसरातून अभिनंदनचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे. यावेळी या कार्यक्रमाला युवा ग्रामीण पत्रकार संघटना रायगाव तालुक्याचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कारवटकर, तालुका उपाध्यक्ष लोकेश दिवे कार्याध्यक्ष उमेश कांबळे, सचिव शशीम कांबळे, संघटक गोपीचंद ढाले लोकेश दिवे उपाध्यक्ष, असलम पठाण कोषाध्यक्ष, अरविंद कोडापे प्रसिद्धी प्रमुख जगदीश गोबाडे व महाराष्ट्रातील व इतर राज्यातील युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे पसंत सदस्य उपस्थित होते.
Discussion about this post