
रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी झालेल्या राज्यस्तरीय गडारोहण स्पर्धा किल्ले रायगड ( स्पर्धा मार्ग-चित्तदरवाजा-महादरवाजा-हत्ती तलावाच्या डाविकडून-
होळीचा माळ )या स्पर्धेमध्ये जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था,महाराष्ट्र (विभाग रत्नागिरी) मधील स्पर्धा परीक्षा अभ्यासिका/क्लास/पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेत असलेल्या वृषाली गोणबरे,गाव रानपाट,रत्नागिरी हिने 1700 पायऱ्या चढत रायगड सर करून पाचवा क्रमांक मिळवून मान मिळवला.
वृषालीने आपल्या परिश्रमांनी आणि अथक प्रयत्नांनी हे यश मिळवले, ज्यामुळे जिजाऊ संस्थेचे नाव रोशन झाले. जिजाऊ संस्थेच्या वतीने वृषालीचे हार्दिक अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच रत्नागिरीच नाव रोशन केल्यामुळे सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..
Discussion about this post