सांगली जिल्ह्यातील पर्यटनामध्ये शिराळा तालुका नैसर्गिक आणि भौगोलिक दृष्ट्या अग्रभागी आहे निसर्गाचे वरदान लाभलेल्या शिराळा तालुक्याला पौराणिक महत्वही तितकेच आहे. शिराळा तालुक्यातील निसर्ग संपदा हि जगभरात प्रसिद्ध आहे. येथील चांदोली अभयारण्य हे निसर्ग प्रेमी पर्यटकांना नेहमी आकर्षित करत असते. यंदाही सुरु असलेल्या हिवाळा ऋतू मध्ये थंड वातावरणात पर्यटकांची गर्दी सध्या जलाशयामध्ये नौका विहारासाठी वाढत आहे. विशेष करून चांदोली धारण अभयारण्य आणि लगतच्या गावांमध्ये छोट्याश्या कांडवण धरण परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी पहायला मिळत आहे. शिराळा तालुक्याचे वैभव असलेले चांदोली अभयारण्य वसंत सागर जलाशय आणि येथील नदीपात्र नेहमीच पर्यटकांना खुणावत असतो. अनके पर्यटक येथे वनभोजनाचा आनंद घेताना दिसून येतात मात्र अलीकडील काळात काही हौशी पर्यटकांकडून हुल्लडबाजीचें प्रकार घडून येत आहेत त्यामुळे निसर्गसंपदा आणि वन्यप्राण्यांम्ध्ये भयाचे वातावरण तयार होतेय याबाबत आमच्या प्रतिनिधींनी शिराळा तालुक्याच्या तहसीलदार शामला खोत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या,’ शिराळा तालुक्यातील महत्वाच्या पर्यटन स्थळांकडे प्रशासनाचे लक्ष नेहमी असते वन विभाग आणि महसूल प्रशासनाकडून वेळोवेळी पर्यटकांना योग्य सूचना दिल्याही जातात मात्र कधीतरी हुल्लडबाजीचे प्रसंग घडत असतील तर आम्ही नक्की पोलीस प्रशासन आणि वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने नक्की कारवाई करू असे प्रसंग जरी पर्यटकांना अनुभवायला मिळाले तरी त्यांनी माझ्या किंवा वन विभाग अथवा पोलीस प्रशासनाला त्याची त्वरित कल्पना द्यावी कारण आमचा शिराळा तालुका हा भौगोलिक दृष्ट्या दुर्गम भागात गणला जातो. आणि निसर्गाची जपणूक हि सर्वांचीच जबाबदारी आहे असे मला वाटते. सध्या मात्र येथील डोंगर दऱ्या पर्यटकांनी फुलून गेल्या आहेत. आल्हाददायक वातावरणामुळे सध्या शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्यात पर्यटकांना वेगळी अनुभूती मिळत आहे.
Discussion about this post