नेर गावातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींना आवाहन करण्यात येते की सन 2015 ते 2020 या कार्यकाळात आम्ही पदावर असतांना प्रधानमंत्री आवास योजनेत एकूण 1800 लाभार्थी ची नावे मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात आली होती व गावात सदर प्रत्येक ग्रामस्थांना प्रमाणपत्र देखील देण्यात आले होते.त्यापैकी एकूण 900 घरकुले सन 2020ते 2025 या कार्यकाळात पूर्ण झाली आहेत व उर्वरित 900 ग्रामस्थांची नावे ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
तरी ज्यांची नावे आली असतील त्यांनी ग्रामपंचायत मध्ये जाऊन योग्य ती कागदपत्रे जमा करावी. आपणास काही अडचण असल्यास संपर्क साधावा. तसेच आज रोजी जिल्हा परिषद सिओ हे नेर गावी आले असतांना त्यांनी सांगितल्यानुसार यापुढे देखील अजुन सर्व्हे होणार असून आजपर्यंत ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांना देखील लाभ मिळणार आहे. मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मागेल त्याला घर आणि मागेल त्याला विहीर व सौर ऊर्जा प्रकल्प असे जाहीर केले आहे त्यामुळे आपण संपर्क साधावा आपणास मदत व मार्गदर्शन करण्यात येईल.
धन्यवाद..
आपले नम्र
मा शंकरराव खलाणे (माजी सरपंच )
मा. मनीषा शंकरराव खलाणे (माजी जिल्हा परिषद सदस्या )
Discussion about this post