उमरी (तालुका प्रतिनिधी ) १३जानेवारी २०२५…. उमरी तालुक्यातील हुंडा तांडा येथील अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार काल सायंकाळी सात ते आठ दरम्यान घटना घडली.
झालेल्या अपघातात विठ्ठल मोतीराम राठोड वय (५५)व अरविंद सुभाष जाधव वय (३०) दोघेही रा हुंडा तांडा ता.उमरी अशी मयताची नावे आहेत.
उमरी येथे हमालीचे काम आटोपून घरी परत जात असताना हिरडगाव पाटी जवळ भरधाव वेगाने येऊन अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला
जवळील पोलिस ठाणे उमरी येथील पि आय अंकूश माने हे घटनास्थळी दाखल झाले.
या दोघांवरही उमरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.दिव्या भारती यांनी त्यांची तपासणी केली असता .मरण पावल्याचे घोषित केले.
Discussion about this post