शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे: साकोली तालुक्यातील कुंभली येथे मंगळवार (दि.14)सुरू असलेल्या प्रसिद्ध दुर्गाबाई डोह यात्रेमध्ये कृषी विज्ञान केंद्र साकोली यांच्याद्वारे प्रशिक्षित शेतकरी पूजा मोटघरे व जागेश्वर यांनी आवळा पदार्थ, आवळा सुपारी, आवळा कॅन्डी मुखवास, आवळा लोणचे, मुरब्बा, पावडर शेतकऱ्यांचे प्रॉडक्ट, धूप , मंजन, फिनाईल विक्रीचा स्टॉल लावलेला आहे. या यात्रेमध्ये या स्टॉलला चांगला प्रतिसाद मिळत असून उत्पादनांची विक्री होत असल्याचे कृषी विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ वैज्ञानिक श्रीमती उषा डोंगरवार यांनी कळविले आहे. हे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असून यासाठी श्रीमती पूजा मोटघरे यांचा 7083553752 या क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल.
Discussion about this post