
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे..
मानोरा :
तालुक्यातील कारखेड चे ग्रामदैवत श्री. शंकरगीरी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचा दि.१२ रोजी श्री. शंकरगीरी जय शंकरगीरी यांच्या जय घोष करीत समारोप करण्यात आला.
दि.४ पासुन श्री.शंकरगीरी महाराज पुण्यतिथी सोहळ्याला सुरुवात झाली, भागवत कथा प्रवक्ते ह.भ.प राहुल महाराज कडू यांच्या अमूतयम वाणीतुन गेली सात दिवस भागवत कथेचे विवेचन झाले, दि.११रोजी सकाळी ११वाजता काल्याचे किर्तन करण्यात आले,दुपारी २ वाजता महाप्रसादाला सुरुवात झाली. महाप्रसादाचे अन्नदान स्व.नामदेव चिंतामण टेकाळे यांच्या स्तुती प्रित्यर्थ श्री.रमेश नामदेव टेकाळे,सुभाष,नामदेव टेकाळे यांचा होता ,हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
बुधवार दि.१२ रोजी सकाळी ग्रामदैवताची पालखी मार्गस्थ झाली.गाव घरोघरी पालखी चे पुजन करण्यात आले.प्रमुख मार्गावर रांगोळी काढून तोरणे बांधण्यात आली,पालखी मध्ये महीला सहभाग मोठ्या प्रमाणावर होता , त्यानंतर श्री शंकरगीरी महाराज सभागृहात आरती करून समारोप करण्यात आला..
२०३१ पर्यंत महाप्रसादाचे अन्नदाते बुक
ग्रामदैवत श्री. शंकरगिरी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याला महाप्रसादाचे अन्नदान करण्यासाठी १९९० पासुन अन्नदान करण्यासाठी लीग लागली आहे.त्या यादीत वाढ होऊन २०३१ पर्यंत महाप्रसादाचे अन्नदाते बुक झाले आहे.शिवाय सात दिवसाचे अन्नदाते यांची सुध्दा नावे बुक झाली आहे.
Discussion about this post