- विकासात संगमनेर तालुका राज्यात पहिल्या तीन मध्ये – विजय वडेट्टीवार
- राजेश टोपे, डॉ. रावसाहेब कसबे व वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटचा प्रेरणा दिनानिमित्त गौरव
संगमनेर दि. 12
छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांचा विचार घेऊन या परिसरामध्ये स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी कार्य केले आहे. सहकार व शेती क्षेत्रातील त्यांनी केलेले कार्य हे महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात मोठे योगदान देणारे असल्याचे गौरवोद्गार कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी काढले आहे. तर बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासामध्ये संगमनेर तालुका हा राज्यातील पहिल्या तीन मध्ये असल्याचे प्रतिपादन माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
यशोधन मैदानात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे होते. तर व्यासपीठावर माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार सत्यजित तांबे, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार मोहन दादा जोशी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, प्रभावती ताई घोगरे, दशरथ सावंत, मधुकरराव नवले, राजवर्धन थोरात आदी उपस्थित होते.
तर डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले की, भाऊसाहेब व अण्णासाहेब यांनी डाव्या विचाराच्या तालुक्यांना निर्मितीक्षम बनविले. यावेळी मधुकरराव नवले, करण ससाणे, सचिन गुजर, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, संपतराव मस्के, उत्कर्षा ताई रूपवते, विजय बोराडे, अरुण पा कडू, प्राचार्य केशवराव जाधव, प्रा बाबा खरात उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत ॲड. माधवराव कानवडे यांनी केले. प्रास्ताविक माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर सभापती शंकर पाटील खेमनर यांनी आभार मानले. यावेळी संगमनेर तालुक्यातील कार्यकर्ते नागरिक पदाधिकारी महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Discussion about this post