तळेरे:- तळेरे गावचे युवा नेतृत्व,कणकवली माजी सभापती,भाजपा तालुका मंडळ अध्यक्ष श्री. दिलीपजी तळेकर यांचा सर्व मित्र मंडळी आणि भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने नामदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या ठिकाणी जल्लोषात जन्मदिन सोहळा साजरा करण्यात आला.
या सोहळ्यासाठी आपला व्यस्त दिनक्रम असून देखील आपल्या कार्यकर्त्यासाठी मा.नामदार श्री.नितेशजी राणे साहेबांनी जन्मदिन सोहळ्यासाठी तळेरे येथे हजेरी लावली. *दिलीपजी तळेकर राणे कुटुंबीयांनशी निष्ठावंत असणारे माझे सहकारी आहेत. दिलीपजींन सारख्या कार्यकर्त्यांमुळे आमदार झालो, आता नामदार आहे. त्यामुळेच आता इथपर्यंत पोहोचलो. कुणावरही अन्याय झाला तर आमच्या खांद्याला खांदा लावून दिलीपजी उभे असतात. येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींन नंतर दिलीपजी तळेकर यांच्या नावा पुढे कुठलतरी पद असेल* अस बोलून जन्म दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी माजी जि. प. बांधकाम सभापती.श्री.रविंद्र जठार. माजी सभापती. श्री.मनोज रावराणे,माजी उप सभापती.श्री.संतोष कानडे,कासार्डे माजी सरपंच श्री.संतोष पारकर, नडगिवे सरपंच श्री.कर्ले.श्री.नाना शेटये, सरपंच. श्री. हनुमंत तळेकर, माजी सरपंच. सौ. साक्षी सुर्वे,सौ.देवकी तळेकर.उपसरपंच सौ. रिया चव्हाण, माजी उपसरपंच श्री. शैलेश सुर्वे,श्री.दिपक नांदलस्कर,श्री.दिनेश मुद्रस ,दारुम माजी उपसरपंच श्री.भरत चव्हाण, श्री. बबलू पवार,श्री.अशोक तळेकर,श्री.नामदेव वाडेकर, खारेपाटण-तळेरे विभागातील सर्व कार्यकर्ते, मित्र परिवार व ग्रामस्थ आपल्या लाडक्या दिलीपजींना म्हणजे दिलीप भाईला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.

Discussion about this post