
कणकवली तालुकास्तरीय बाल कला,क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धा नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या पटांगणावर उत्साहात पार पडली.
या स्पर्धेमध्ये तळेरे येथील जि. प.आदर्श पूर्ण प्राथमिक शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांनी उत्तम, शिस्तबद्धपणे सादरीकरण करत समूहगायनामध्ये लहान गटातून प्रथम क्रमांक पटकावला आणि जिल्हास्तरवर झेप घेतली. तसेच या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत तळेरे प्रभागाने प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा समिती सदस्य, पालक वर्ग आणि ग्रामस्थांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Discussion about this post