Saif Ali Khan Attacked | मनोरंजन क्षेत्रातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला आहे.
सध्या अभिनेत्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्याच्यावर उपचार केले जात आहेत. (Saif Ali Khan Attacked)
सैफ अली खानवर वांद्रे येथील राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची माहिती काही मीडिया रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. वांद्रे येथील राहत्या घरात सैफ आली खानवर अज्ञात
व्यक्तीने चाकू हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात अभिनेता जखमी झाला असून त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
Discussion about this post