चिमूर तालुक्यात रेती तस्करीचा तिसरा बळी : सावरगाव येथील घटना
तालुका प्रतिनिध – समीर बल्की
भिसी :- चिमूर तालुक्यातील नेरी जवळील सावरगाव गावाजवळ पहाटे 5 वाजताच्या सुमारास ट्रकटर पलटून हमाल मजुराचा जागीच मृत्यू झाला तर ट्रॅक्टर चालक गंभीर आहे.सावरगाव येथील सचिन बापूराव मेश्राम वय 30 वर्षे या तरुणांचा ट्रकटर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला सदर तरुण रेतीच्या ट्रकटरवर हमालाचा काम करीत होता रात्रीच्या अंधारात रेतीची चोरी करून तस्करी करण्याचे काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे दि 16 च्या पहाटे सावरगाव येथे रेती टाकून नेरी कडे परत भरधाव जात रेती आणतांना वीणा नंबर च ट्रॅक्टर नेरीला नेत असताना सावरगाव समोरील छोट्या मोडिवर शेतात ट्रॅक्टर पडून मजूर गाडीच्या खाली दबल्याने मृत्यू झाला.सदर गाडी नेरी येथील अनिकेत जंभुळे यांच्या मालकीचा असून तस्करी साठी वीणा नंबरची गाडी वापण्यात आली आहे.वृत्त लीहेपर्यंत तपास सुरू होता. तसच ट्रॅक्टर चालक प्रशांत उद्धव डोरलिकर वय 25 सावरगाव हा असून त्यांचेवर कोणते गुन्हा याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.
रेती तस्करीत जीव गमावण्याची ही चिमूर तालुक्यातील तसरी घटना होय याअगोदर खडसंगी परिसरात ट्रकटर वरून पडल्याने तरुणांचा बळी गेला होता त्यानंतर शिवनपायली येथील युवकांनी सुधा जीव गमावला आहे. मात्र एवढी मोठी घटना होऊन ही महसूल विभाग रेती तस्करीवर अंकुश लावू शकत नाही हे ही मोठी शोकांतिका आहे त्यामुळे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन रेतीतस्कर पुन्हा किती बळी घेतील हे सांगता येत नाही तरुण युवकाचा बळी गेल्याने परिसरात शोक व्यक्त होत आहे सदर घटनेने पुन्हा एकदा रेती तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे ,महसूल विभाग आणि पोलीस विभाग आता कोणती भूमिका घेते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे? मृतकाच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी व दोषींवर कडक कारवाई करावी तसेच ट्रकटर जप्त करण्यात याचे अशी मागणी नागरिक करीत आहेत
पुढील तपास नेरी चौकीचे पोहोवा राजकुमार चौधरी, आनंद डांगे करीत आहेत.
Discussion about this post