भाविकांचा वाढता प्रतिसाद मुरबाड दि. 16 ता. प्रतिनिधी गौरव खरे. ठाणे जिल्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा गावी गेली 225 वर्षा पासून सुरु झालेल्या म्हसा यात्रेला महाराष्ट्रा सह कर्नाटक गुजरात केरळ गोवा येथील अनेक भाविक म्हसोबाच्या दर्शना साठी व यात्रेतील खरेदी साठी भाविक येत असतात नवसाला पावणारा म्हसोबा अशी महंती असणार देव असं पूर्वी पासून मानणारे भाविक भक्त यथे येत असतात .
या यात्रे मध्ये प्रशिद्ध अशी ताजी मिठाई यथे जागेवर बनवून मिळते त्यात गुलाबजामून, हातोली, पेठे, मावा सह अनेक प्रकारची मिठाई येथे मिळते तसेच प्रशिद्ध बैल बाजार किमान 50एकर जागेवर भरतो त्या मध्ये विविध ठिकाणावरून विकण्यासाठी खिलारी बैल आणले जातात तर गोंगडी बाजार, ब्लॅंकेट, रजई चा बाजार या यात्रे मध्ये मोठया प्रमाणात भरतो तर शेतीची औजारे, बैलांचे कासणे, तसेच विविध प्रकारची खेळणी दुकानें घरातील लागणारे साहित्य म्हसा यात्रे मध्ये मिळते तर मनोरंजनासाठी आकाश पाळणी, मौत का कुव्वा, रेल्वे, जम्पिंग, होडी, सारखे अनेक मनोरंजना साठी साधने म्हसा यात्रेत आहेत तर ग्रामपंचायत ने चांगल्या प्रकारचे नियोजन या वेळेस म्हसा यात्रेसाठी केले आहे तसेच मुरबाड उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश शिंदे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिते तसेच गुन्हे अनवेशन विभाग पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वा मध्ये चोख पोलीस बंदोबस्त व कोणताही अनुचित प्रकार घडू नये या साठी बारीक लक्ष दिले जात आहे तर पोलीसअधिकारी 25 व 350 पोलीस कर्मचारी व 100 सोयंसेवक असा चोख बंदोबस्त म्हसा यात्रासाठी तैनात केला आहे
Discussion about this post