लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा, लष्करी अळी व विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव –
शेतकऱ्यांचे महत्वाचे खरीप हंगामातील पीक म्हणजे सोयाबीन पीक आहे. सोयाबीन पेरणीपासून ते काढणीपर्यंत पिकाला लहान लेकरासारखे जपावे लागते. बियाणं पेरणी, खताचा डोस, तणनाशक फवारणी, कीटकनाशक फवारण्या अशाप्रकारे खूप मेहनत घेऊन पिकाला जोपासणे शेतकऱ्यांना खूप खर्चात जाते. आणि अशातच बळीराजाला योग्य पाऊसाची प्रतीक्षा असते.
खळेगाव परिसरात अद्यापही दमदार पाऊसाची प्रतीक्षाच –
पावसाळ्याचा पाऊस सुरु होऊन 2 महिने उलटून गेले तरीही खळेगाव व आसपास परिसरातील 10 ते 12 खेड्यांमध्ये अजूनही दमदार पाऊस नाही.झिमझिम पावसाच्या भरोशावर शेतकऱ्यांची पिकांची फक्त वाढच होत गेली आणि फुले, शेंगा मात्र ५०% या प्रमाणातच लागलेल्या दिसत आहेत. अद्यापही परिसरामध्ये शेतकऱ्यांना दमदार पाऊसाची प्रतीक्षाच आहे.
सोयाबीन पिकांवर किडिंचा प्रादुर्भाव –
खळेगाव व परिसरामध्ये शेकडो हेक्टर जमिनीवर शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक पेरलेले असून दमदार पाऊस नाही.झिमझिम पाऊसाअभावी प्रमाणाच्या वर वाढ झालेल्या सोयाबीन पिकांना माल कमीच प्रमाणात तर आहेच परंतु चक्रीभुंगा, लष्करी अळी व इतर किडिंचा, रोगांचा खूप जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने परिसरातील शेतकरी वर्ग मात्र चिंतेत आहे.
पीक हातून जाण्याची शक्यता –
खळेगाव व परिसरातील झालेल्या किडिंच्या प्रादुर्भावाने व दमदार पावसाच्या प्रतीक्षेने शेकडो हेक्टर शेतीवरील शेतकऱ्यांचे मुख्य पीक मानले जाणारे सोयाबीन व इतर पिकांमध्ये कमालीची घट येण्याची शक्यता नाकारता नाही.
खळेगाव तलाव अद्यापही जलसाठा भरण्याच्या प्रितेक्षेत -१०% च जलसाठा
खळेगाव चा तलाव हा जवळपास १०० हेक्टर जमिनीवर बनलेला असून तलावाखाली १ ते दीड हजार हेक्टर जमीन सिंचन क्षेत्राखाली येते आणि तलावाला लागून १० ते १२ गावांच्या जल जीवन मिशन योजनेच्या व पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी आहेत.मात्र असाच जर पाऊस झिमझिम चालत राहिला आणि दमदार पाऊस नाही झाला तर मोठे संकट उभे राहू शकते.
ता. प्रीतिनिधी – देविदास वायाळ
बातम्यासाठी संपर्क -7798362011
Discussion about this post