जळकोट (ता. उदगीर) येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी परिश्रम घेणाऱ्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी उपस्थित महिला भगिनींशी संवाद साधून रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा दिल्या. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल लाडक्या बहिणींनी राख्या बांधून आशीर्वाद दिले. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या बँक खात्यावर रक्षाबंधन सणापूर्वी तीन हजार रुपये जमा करून सरकारने वचनपूर्ती केली आहे. सर्व जाती-धर्मातील महिलांसाठी ही योजना आहे. या योजनेत लाडक्या बहिणींना दरमहा तीन हजार रुपये मिळणार असून, त्यातून त्यांच्या संसाराला मोठा हातभार लागणार असल्यामुळे महिला भगिनींना मोठा आनंद झाला आहे.
याचे खूप समाधान आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) व महायुती सरकार गोरगरिबांच्या विकासासाठी अविरत काम करत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत शिक्षण, मोफत तीन गॅस सिलिंडर, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण भत्ता यांसारख्या कल्याणकारी योजना यापुढेही अखंड सुरूच रहाव्यात यासाठी जनतेने महायुती सरकारला खंबीर साथ द्यावी.
Discussion about this post