आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरळ याठिकाणी बाल चमुंची भाजी मंडई आणि हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीचे व्यवहार कळावेत…नफा – तोटा ही संकल्पना स्पष्ट व्हावी… यासाठीच हा उपक्रम…
मुलांनीही खूप छान तयारी केली होती…सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, चटकदार भेळ,चमचमीत पाणी पुरी,spicy कोबिमंचुरियन, खमंग भजी, राजगिरा
लाडू, शेंगदाणा लाडू, शेतातील रताळी आणि बरेच काही…
शिरळ गावातील ग्रामस्थ आणि पालकांनीही मनसोक्त खरेदी केली… वस्तू विक्री करत असतानाचा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद टिपण्यात खूपच समाधान मिळते…आणि तेच आम्ही अनुभवत होतो… बालबाजारमध्ये स्वच्छंदी फेरफटका मारून झाल्यावर हळदी कुंकू समारंभ सुरू झाला… शिरळ गावच्या सन्माननीय सरपंच सौ. मनिषाताई सुर्यवंशी यांनी सरस्वती पूजन केले…शिक्षक व माता पालक यांच्यात मनमुराद गप्पा झाल्या, शैक्षणिक चर्चा झाल्या… बहुसंख्येने उपस्थित राहिलेल्या महिलांमुळे हळदी कुंकू समारंभ उठावदार झाला…
Discussion about this post