सोयगाव
महावितरण तर्फे अनधिकृत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांवर गुरूवारी आमखेडा परिसरातील १९ विज चोरी करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली.
महावितरणतर्फे करण्यात आलेल्या विज चोरी मोहिमेमध्ये सोयगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता राजकुमार खिंडरे, सोयगाव कक्ष अभियंता मोईज पठाण तसेच सोयगाव कक्षातील जनार्दन जोहरे व विष्णू लाड यांनी ही मोहीम सोयगाव व आमखेडा भागातील अनधिकृत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांवर राबवली.
सदरील मोहीम मध्ये मोहिमेमध्ये आकडेबहादरांवर कारवाई करून त्यांचा घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. सदरील सर्व आकडेबहादरांना महावितरण तर्फे विज चोरी करणाऱ्याना दंडाचे बिल देण्यात येणार आहे.या धडक कारवाईमुळे सर्व अनधिकृत वापर करणाऱ्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
महावितरण तर्फे महावितरण अभय योजना राबवल्या जात असून सदर योजनेअंतर्गत ज्या ग्राहकांचे कायमस्वरूपी वीज मीटर काढून नेण्यात आले आहे. त्या ग्राहकांना परत मीटर घेण्यासाठी घवघवीत सूट देण्यात येणार असून सदर योजनेची जाहिरात सोयगाव उप विभागामार्फत करण्यात येत आहे.
फोटो ओळ: सोयगाव – आमखेडा परिसरातील अनधिकृत रित्या विज चोरी करणाऱ्यांकडून जप्त केलेल्या केबल व मोहीम राबविणारे अधिकारी कर्मचारी
Discussion about this post